back pain  sakal
लाइफस्टाइल

Healthy Foods: कंबर दुखीने त्रासलात? मग या गोष्टींचा आहारात नक्की करा समावेश

आजच्या काळात बहुतेक लोक पाठदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत.

Aishwarya Musale

Include Foods Items In Diet: आजच्या काळात बहुतेक लोक पाठदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. ही वेदना बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते. मात्र पाठदुखीचे कारण म्हणजे आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, अनियमित जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ऑफिसमध्ये सतत स्क्रीनसमोर बसणे. आजकाल लोकांमध्ये कंबरदुखी आणि पाठदुखीची समस्या सामान्य झाली आहे.

पाठदुखीचे एक खास कारण म्हणजे ऑफिसमध्ये तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून चुकीच्या पोजिशनमध्ये काम करणे. अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे तुमच्या समस्या वाढत आहेत. यासाठी तुम्हाला तुमचा अनहेल्दी आहार दुरुस्त करावा लागेल.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही रोज खायला सुरुवात करावी. आरोग्य तज्ञ देखील याची शिफारस करतात. कारण आहारात हे पदार्थ खाल्ल्याने स्नायूंना आराम तर मिळतोच शिवाय शरीराच्या अनेक भागांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

1. ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडस्

पाठदुखीपासून आराम मिळवायचा असेल तर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. तुम्हाला पाठदुखीपासून खूप आराम मिळेल.

यासाठी तुम्ही सुक्या मेव्यामध्ये बदाम, अक्रोड, चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स यांचा समावेश करू शकता. जसं की तुम्हाला माहिती आहेच, माशांच्या सेवनाने तुमच्या शरीरात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा पुरवठा होतो.

2. प्रोटीन फूड्स

आजकालच्या खराब आहारामुळे लोकांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवते. त्यामुळे प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यासाठी अंडी, दूध, कडधान्य इत्यादींचे रोज सेवन करावे.

3. हिरव्या भाज्या

जर तुम्हाला सतत पाठदुखी होत असेल तर त्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांच्या सेवनाने तुमची हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

यामध्ये फ्लॉवर, ब्रोकोली, पालक आणि कोबी इत्यादी खाण्यास सुरुवात करा. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते.

4. फळांचे सेवन

अननस, सफरचंद, चेरी, बेरी, लिंबूवर्गीय फळे आणि द्राक्षे इत्यादी ताज्या फळांचा पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आहारात समावेश करावा. फळांचे सेवन केल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते. तसेच पाठदुखीपासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT