लाइफस्टाइल

Health Care News: थोडासा व्यायाम केल्यानंतर लगेच थकता? स्टॅमिना वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

तुम्हाला सुद्धा थोडासा व्यायाम केल्यानंतर लगेच थकवा येतो का?

Aishwarya Musale

आपल्याला चार पायऱ्या चढल्या नंतर किंवा धावल्यानंतर लगेच दम लागतो. थोडासा व्यायाम केला की थकवा येतो. तुमच्यासोबतही असे होते का? तर ही शरीरात स्टॅमिना कमी होण्याची लक्षणे आहेत, ज्यामुळे शरीर लवकर थकते.

तसेच व्यायामासोबतच स्टॅमिना वाढवण्याचीही गरज आहे. या कामात काही पदार्थ मदत करतात, ज्यामुळे शरीराला व्यायाम करण्याची ताकद मिळते आणि स्टॅमिना वाढतो. जेणेकरून तुम्ही बराच वेळ व्यायाम करू शकता.

स्टॅमिना वाढवणारे पदार्थ

स्टॅमिना वाढवण्यासाठी काही खास खाद्यपदार्थ खावे लागतील कारण त्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हलही वाढते. एकच गोष्ट खाल्ल्याने तुमचा स्टॅमिना झपाट्याने वाढू शकत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. यासाठी अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ खावे लागतील. जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ.

1. केळी

केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, नैसर्गिक साखर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. रोज २ केळी खाल्ल्यास स्टॅमिना वाढेल. व्यायामानंतर केळी खाल्ल्यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होईल.

2. बदाम

बदाम हे हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि फायबरचा समृद्ध स्रोत मानला जातो. दररोज मूठभर बदाम खा, सॅलडमध्ये घाला किंवा बदाम बटर वापरा.

3. पालक

पालकामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ते लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढविण्यात मदत करतात, ऊर्जा पातळी वाढवतात. तुम्ही तुमच्या सॅलड, सँडविच, स्टिर-फ्राय किंवा स्मूदीमध्ये पालक समाविष्ट करू शकता किंवा तुम्ही पालकाचा ज्यूस देखील पिऊ शकता.

4. संत्री

संत्रा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत मानला जातो, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की संत्रा खाल्ल्याने ऊर्जा पातळी सुधारते, ज्यामुळे थकवा कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: इगतपुरी शहराचा विकासासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार - भुसे

SCROLL FOR NEXT