Anti Ageing Foods sakal
लाइफस्टाइल

Anti Ageing Foods: कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या? मग आहारात समाविष्ट करा 'या' गोष्टी

वाढत्या वयाबरोबर त्वचेवर नैसर्गिकरित्या वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

Aishwarya Musale

नेहमी तरुण दिसणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. तुम्ही, आम्ही किंवा जगातील कोणत्याही स्त्रीला फक्त तिचा चेहरा सुंदर असावा असे वाटते. पण वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. मात्र, असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही एजिंग साईन्स नक्कीच कमी करू शकता.याबद्दल जाणून घेऊया.

पपई

पपई हे वंडर फूड मानले जाते. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी तुमच्या त्वचेची लवचिकता सुधारू शकतात. हे सुरकुत्या कमी करण्यास मदत करू शकते.

त्याच्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि फॉस्फरस समाविष्ट आहे.

पालक

पपई प्रमाणेच, पालक उच्च प्रमाणात हायड्रेटिंग आणि अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, के, ल्युटीन, मॅग्नेशियम आणि प्लांट बेस्ड हीम आयर्न भरपूर प्रमाणात असते. या हिरव्या पालेभाज्यातील उच्च व्हिटॅमिन सी सामग्रीमुळे कोलेजन उत्पादन वाढवते ज्यामुळे तुमची त्वचा मजबूत आणि स्मूद होते.

बेरीज

बेरी एजिंग साईन्स कमी करतात. रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या बेरी त्यांच्या अँटिऑक्सिडंट फायद्यांसाठी ओळखल्या जातात.

ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे वृद्धत्वविरोधी पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. हे बेरी अकाली कोलेजनचे नुकसान टाळण्यासाठी देखील ओळखले जातात.

डाळिंब

डाळिंब त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. हे अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांवर कार्य करते आणि कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: अभिषेक शर्मा OUT, ४ खेळाडू IN? तिसऱ्या ट्वेंटी-२० साठी कशी असेल भारताची Playing XI? प्रिन्स यादव जखमी...

'सनई चौघडे' आणि 'हास्यजत्रा'नंतर निमिष कुलकर्णीची मोठी झेप; 'द्विधा'तून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज, नेमकं काय घडलं?

टीम इंडिया नंबर १ ! झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील विजयानंतर इंग्लंडला मागे फेकले

अभिजीतच्या घरी गेले शिंदेंचे मंत्री, आई-वडिलांची घेतली भेट; काय घडलं? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT