Health Care News sakal
लाइफस्टाइल

Health Care News: शरीरातील सूज कमी करण्यासाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश...

ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

Aishwarya Musale

हात-पायांवर सूज येणे ही सामान्य समस्या आहे. ही कोणालाही होऊ शकते. मात्र, तुमच्या हात, पाय किंवा शरीरावर सतत जर सूज येत असली तर ते चांगले नाही. ही काही आजाराची लक्षणे देखील असू शकतात.

शरीरातील ही सूज दूर करण्यासाठी काही सामान्य घरगुती उपायांचा अवलंब केला जातो. तुम्हालाही ही समस्या टाळायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता.

बीटरूट

सूज कमी करण्यासाठी तुम्ही बीटरूटचे सेवन करू शकता. तज्ज्ञांच्या मते, बीटरूटमध्ये बीटालेन्स नावाचे अँटीऑक्सिडेंट असते. त्यात नायट्रेट देखील असते, या दोघांचे मिश्रण संधिवात सारख्या दाहक परिस्थितीत फायदेशीर ठरू शकते. हे शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील ओळखले जाते.

पालक

पालकचेही सेवन करू शकता. पालकमध्ये झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन हे दोन शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात जे जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत होते. हे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यात मदत करू शकतात.

लसूण 

लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून आपल्या शरीराच्या संरक्षणात्मक यंत्रणेस समर्थन देतात. यामुळे अल्झायमर रोगासारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

लवंग

लवंगमध्ये युजेनॉल नावाचे कंपाउंड असते जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात जे सूजपासून आराम देतात.

आवळा

आवळा गॅलिक अॅसिड, एस्कॉर्बिक अॅसिड आणि फेनोलिक कंपाऊंड्स सारख्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, ज्यामुळे ते जळजळ कमी करते आणि जुनाट आजारांचा धोका देखील कमी करते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात आठ विधेयके केली जाणार सादर

Sarpanch Election : गावगाड्यातल्या राजकारणात बदल होणार, कोल्हापूर जिल्ह्यात १०२६ सरपंचांचे पुन्हा आरक्षण

Israel Strike On Syria : सीरियावर इस्त्रायलयचा सर्वात मोठा हल्ला; गाझा अन् इराण नंतर का केले लक्ष्य?

Monsoon Update: मराठवाड्यात पावसाची चाहूल; नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता, जाणून घ्या कसे असेल हवामान?

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT