food  sakal
लाइफस्टाइल

Eating Food with Hands: तुम्हालाही चमच्याने जेवायची सवय आहे का? मग हे नक्की वाचा

चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाणे अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

Aishwarya Musale

Lifestyle News : आजच्या तरुण पिढीतील बऱ्याचशा लोकांमध्ये मध्ये काटा आणि चमच्याने खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. जेवण कुठलंही असो पण त्यांच्या हातात लगेच चमचा येतो. हा ट्रेंड भारतात इंग्रजांनी आणला खरा.

पण, आता तिकडचेच काही लोक हाताने जेवतात आणि भारतीय लोकांचा कल चमच्याने खाण्याकडे वाढत आहे. पण, हाताने अन्न खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यापैकी काही फायदे शरीराला लाभदायक ठरतात.

होय, चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाणे अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तुमची पचनशक्ती मजबूत व्हावी असे वाटत असेल तर हाताने खावे. हाताने जेवल्याने वजन कमी होण्यास मदत होते, असेही म्हटले जाते. आयुर्वेदानुसार, हाताने खाल्ल्याने अन्न लवकर पचते. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने अन्न खाता तेव्हा तुम्ही ते पूर्ण चवीने खातात आणि त्यामुळे अन्नाला वेगळीच चव येते.

ऍपेटिट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, जेव्हा तुम्ही हाताने अन्न खाता तेव्हा हातांच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. हाताने खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. जी आजची पिढी विसरत चालली आहे. मात्र, आजही बहुतांश लोक हाताने खाणे पसंत करतात. त्यांना अशा प्रकारे खाणे देखील आरामदायक वाटते.

आयुर्वेदानुसार बोटांमध्ये असलेल्या मज्जातंतूंमुळे पचन सुधारते. खरं तर, जेव्हा तुम्ही हाताने खातात, तेव्हा तुम्हाला पोत, चव आणि सुगंध याविषयी अधिक माहिती असते, कारण तुम्ही हाताने खाता.

हाताने खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते. यामुळे बोटांच्या आणि हातांच्या स्नायूंचाही व्यायाम होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

तुम्ही तुमच्या हातांची हालचाल जितकी अधिक सुरळीत ठेवाल तितका रक्तप्रवाह सुरळीत राहील. भात, कडधान्य, भाज्या एकत्र करून खातात किंवा चपाती मोडताना बोटांची हाडे आणि सांधेही व्यवस्थित काम करतात.

तुम्ही जेवण्यापूर्वी तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ करावेत. अन्यथा हानिकारक जंतू, हातामध्ये असलेले बॅक्टेरिया, नखे तुम्हाला आजारी बनवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT