लाइफस्टाइल

Health Care News : आहारात बदल करून कर्करोगाचा धोका कमी करता येतो का? जाणून घ्या

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ खा...

Aishwarya Musale

कर्करोग ही जागतिक स्तरावर वेगाने वाढणारी गंभीर आणि जीवघेणी आरोग्य समस्या आहे. विविध प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो, अगदी लहान मुलेही त्याचा बळी ठरत आहेत. आनुवंशिकता आणि पर्यावरणीय घटकांव्यतिरिक्त, जीवनशैली आणि आहारातील व्यत्यय देखील या रोगाचा धोका वाढवतात.

जगभरातील कर्करोगाच्या वाढत्या धोक्यांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम "क्लोज द केअर गॅप" अशी आहे. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी सतत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आहारातील बदल फायदेशीर ठरू शकतात का ते जाणून घेऊया.

संशोधकांचे म्हणणे आहे, कर्करोगासाठी अनेक घटक असू शकतात. ज्या लोकांच्या कुटुंबात याआधी कर्करोग झाला आहे त्यांना या आजाराचा अनुवांशिकदृष्ट्या जास्त धोका असू शकतो. याशिवाय, काही पर्यावरणीय घटक जसे की रसायनांचा अतिरेक, मायक्रोप्लास्टिकचा संपर्क, धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. एवढेच नाही तर विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या अतिसेवनामुळेही या आजाराचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे.

प्रक्रिया केलेले पदार्थ हानिकारक असू शकतात

संशोधकांच्या एका टीमने सांगितले की, साखरेचे प्रमाण जास्त आणि फायबर न्यूट्रिएंट्स कमी असलेल्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

विशेषतः संशोधकांना असे आढळून आले आहे की शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे आहार, याच्या अतिसेवनामुळे पोट, स्तन आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका जास्त असल्याचे दिसून येते. 47,000 हून अधिक प्रौढांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्यांनी प्रक्रिया केलेले कर्बोदके जास्त प्रमाणात खाल्ले आहेत, ज्यांनी अशा गोष्टींचे सेवन कमी केले त्यांच्या तुलनेत कोलन कॅन्सर आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका जवळपास दुप्पट होता.

अँटिऑक्सिडंट पदार्थांचे सेवन करा

संशोधकांचे म्हणणे आहे की, काही खाद्यपदार्थांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो असे आढळून आले आहे, तर काही गोष्टींचे सेवन करूनही हा धोका कमी केला जाऊ शकतो. कॅन्सर टाळता येईल असे कोणतेही सुपरफूड नसले तरी काही गोष्टींमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्ही कॅन्सरचा धोका नक्कीच कमी करू शकता. निरीक्षणात्मक अभ्यासात असे आढळून आले की हिरव्या रंगाच्या भाज्यांचे सेवन वाढल्याने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

अनेक भाज्यांमध्ये कॅन्सरशी लढणारे अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. उदाहरणार्थ, ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबीसह क्रूसीफेरस भाज्यांमध्ये आढळणारे सल्फोराफेन असते.

या गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता

संशोधकांचे म्हणणे आहे की कोणताही खाद्यपदार्थ तुम्हाला कर्करोगापासून वाचवेल याची खात्री नाही, परंतु अँटीऑक्सिडंट्स आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असलेल्या गोष्टी तुम्हाला सुरक्षित ठेवण्यास नक्कीच मदत करू शकतात.

संशोधनात असे आढळून आले आहे की जवसाच्या बियांचे सेवन विशिष्ट कर्करोगाविरूद्ध संरक्षणात्मक प्रभावाशी संबंधित असू शकते; कर्करोगाच्या पेशींचा प्रसार कमी करण्यासाठी देखील ते फायदेशीर असल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे काही टेस्ट-ट्यूब आणि प्राण्यांच्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की दालचिनीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म देखील असू शकतात. नट्स नियमित खाल्ल्याने काही प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT