लाइफस्टाइल

Health Care News : शरीरात रक्ताची कमतरता आहे? मग या घरगुती उपायांची घ्या मदत

शरीरात रक्ताची कमतरता आहे? 'हे' 4 घरगुती उपाय तुमच्यासाठी

Aishwarya Musale

हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये अगदी सहज जाणवू शकते. लहान मुले आणि महिलांमध्ये हे अधिक दिसून येते. त्यामुळे ॲनिमियासारखी परिस्थितीही निर्माण होते. मात्र, योग्य खाण्याच्या सवयींच्या मदतीने तुम्ही शरीरातील अशक्तपणावर मात करू शकता.

शरीरातील हिमोग्लोबिन कोणत्याही औषधांशिवाय वाढवता येते. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आहारात बदल करायचा आहे. जाणून घेऊयात अशक्तपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय नेमके कोणते आहेत.

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय करा

अशक्तपणावर मात करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे बीटरूटचे सेवन करणे. तुम्ही सलाड किंवा ज्यूसच्या स्वरूपातही तुमच्या आहारात याचा समावेश करू शकता. त्यात लोहाचे प्रमाण चांगले असते. याशिवाय त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, सल्फर, व्हिटॅमिन सी इत्यादी अनेक पोषक घटक असतात. ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी बीटरूटचे सेवन केलेच पाहिजे.

डाळिंबातही भरपूर लोह असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. तुम्हालाही ॲनिमियाचा त्रास होत असेल तर डाळिंबाचा रस जरूर प्या. त्यात व्हिटॅमिन सी देखील चांगले असते जे लोह शोषण्यास मदत करते.

ॲनिमियावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजूर देखील समाविष्ट करू शकता. त्यात लोह, तांबे, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषक घटक देखील असतात जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.

तुमच्या आहारात टोमॅटो आणि पालक यांचाही समावेश करावा. यामध्ये लोह देखील असते, त्याशिवाय फ्लेक्स सीड्स, भोपळ्याच्या बिया, तीळ हे देखील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यानेही ॲनिमिया दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT