Soaked Almonds eSakal
लाइफस्टाइल

Soaked Almonds : बदाम खाणं फायद्याचं, मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर होईल नुकसान; एका दिवसात किती खावेत?

बदाम खाण्याची पण असते एक मर्यादा, गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास काय होतं ते वाचा...

Aishwarya Musale

भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बरेच लोक बदाम किंवा काजू भाजून किंवा अगदी कच्चे खातात. पण भिजवलेले बदाम जास्त फायदेशीर असतात. फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, फॉस्फरस, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक बदामामध्ये आढळतात जे आरोग्यासाठी चांगले असतात.

गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या बदामांचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी, ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण एका दिवसात आवश्यकतेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी होऊ शकते. दिवसभरात किती बदाम खावेत आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल जाणून घेऊया.

एका दिवसात किती बदाम खावेत?

दोन बदामाने सुरुवात करा. २ बदाम रात्रभर भिजवून सकाळी सोलून खा. (How many almonds to eat in a day?)

जेव्हा तुम्ही दिवसातून 2 बदाम खायला सुरुवात करता आणि जेव्हा ते नीट पचायला लागते, तेव्हा 1 आठवडा-10 दिवसांनी 5 बदाम खायला सुरुवात करा.

जर तुम्हाला सूज किंवा अपचन होत असेल तर बदामांची संख्या वाढवू नका.

तज्ज्ञांच्या मते, बदामांची संख्या हळूहळू वाढवून तुम्ही दररोज 10 बदाम खाण्यास सुरुवात करू शकता.

जर तुम्ही 90 दिवस सतत 10 बदाम खाल्ले तर तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

ज्या लोकांची पचनशक्ती चांगली आहे, ते रोज व्यायाम करतात, योग्य प्रमाणात पाणी पितात, तर तुम्ही रोज 20 बदाम खाऊ शकता.

बदाम आणि इतर नट हे हेल्दी फॅट्स, फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. हे पचायला कठीण असतात.

बदाम खाण्याचे फायदे

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 2 म्हणजे रिबोफ्लेविन देखील असते. (Benefits of eating almonds)

यामध्ये लोह, पोटॅशियम, झिंक, फोलेट आणि व्हिटॅमिन बी आढळतात.

यामुळे तुम्हाला ताकद मिळते आणि पीरियड क्रॅम्प्स दूर होतात.

बदाम पचन आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही चांगले असतात.

यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

हे बीपी, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT