लाइफस्टाइल

Health Care News: जास्त गोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते का? जाणून घ्या

तुम्हालाही जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय आहे?

Aishwarya Musale

आपल्या सर्वांना निरोगी राहायचे आहे. दैनंदिन जीवनात आपण जाणूनबुजून किंवा नकळत अनेक चुका करतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी खाण्याच्या योग्य सवयी निवडल्या पाहिजेत. तसेच काही गोष्टींचा आहारात कमीत कमी समावेश करावा.

खूप गोड, जास्त मीठ किंवा तळलेले अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते. मिठाई खाल्ल्याने केवळ रक्तातील साखरेची पातळी आणि हार्मोनल संतुलनावर परिणाम होत नाही, तर त्याचा आपल्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. जास्त साखर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.

जास्त गोड खाल्ल्याचा परिणाम प्रतिकारशक्तीवर होतो

  • आपण किती गोड खातो याचा थेट संबंध आपल्या आतड्यांच्या आरोग्याशी आणि प्रतिकारशक्तीशी असतो.

  • जास्त गोड खाल्ल्याने आतड्यातील मायक्रोबायोम इम्बॅलेन्स होते, ज्यामुळे आतड्यात असलेल्या चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियामधील संतुलन बिघडते.

  • यामुळे, आतड्यांसंबंधी एपिथेलियल लेयर सूजू शकते.

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आतडे निरोगी असणे महत्वाचे आहे.

  • आयुर्वेदातही पचनसंस्था आणि प्रतिकारशक्ती यांचा थेट संबंध आहे.

  • आयुर्वेदात अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी डायजेस्टिव फायरला आवश्यक मानले जाते.

हृदयाच्या आरोग्यावर परिणाम 

जास्त साखरेचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे पाहिल्यास, साखरयुक्त पेय प्यायल्याने रक्तदाबावर विपरीत परिणाम होतो. यकृत शरीरातील अतिरिक्त साखरेचे फॅटमध्ये रूपांतर करू लागते. या कारणांमुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.   

त्वचेवर वाईट परिणाम

खूप गोड पदार्थ खाल्ल्याने कोलेजन एकमेकांशी जोडले जाते, ज्यामुळे त्वचा घट्ट होते. जास्त साखर खाल्ल्याने त्वचेच्या समस्या जसे मुरुम, सुरकुत्या, काळे डाग होण्याची शक्यता वाढते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT