लाइफस्टाइल

Constipation Problem Solution : या गोष्टींचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम, जाणून घ्या

या घरगुती उपायांनी करा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी.

Aishwarya Musale

सध्या अनेकजण बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करत आहेत. वाढती जीवनशैली, खाण्या- पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सतत जंक फूड्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढताना दिसतेय, विशेषत: तरुण वयातच या समस्येचा सामना करावा लागत आहे. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाल्ल्या जाऊ शकतात हे जाणून घेऊया.

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा

पाणी

पाण्याची कमतरता देखील बद्धकोष्ठतेच्या समस्येस कारणीभूत ठरू शकते, जर आपल्याला बद्धकोष्ठता समस्या असेल तर आपण जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केले पाहिजे. पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, हे त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते.

हिरव्या भाज्या

पालक, मेथी, मोहरी आदी हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. बद्धकोष्ठतेने ग्रस्त लोकांनी अधिक हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. आहारात हिरव्या भाज्या घातल्या तर या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

केळी

केळीमध्ये असलेले उच्च फायबर बद्धकोष्ठतेचे परिणाम सामान्य करण्यास मदत करते. ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. असे अनेक गुणधर्म केळीमध्ये आढळतात जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात, केळी बद्धकोष्ठता दूर करू शकते.

अंजीर

बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये अंजीरचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अंजीरमध्ये फायबर असते, ज्यामुळे उत्सर्जन प्रक्रिया सुलभ करुन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

जांभूळ

जांभळात भरपूर फायबर आढळतात, फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात मदत करू शकते. जांभळाचे सेवन करून पचनसंस्था चांगली ठेवता येते. आहारात जांभूळचा समावेश करून, आपण बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

दही

दहीमध्ये कॅल्शियम आणि फायबर आढळतात. दहीचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होते. दहीमधील प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया आहेत जे आतड्यांच्या हालचाल सुलभ करण्यास मदत करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT