Gum Bleeding sakal
लाइफस्टाइल

Gum Bleeding: तुमच्याही हिरड्यांमधून रक्त येते का? मग हे घरगुती उपाय ट्राय करून बघा

काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.

Aishwarya Musale

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे जी बऱ्याच लोकांना त्रास देते. ही समस्या दातदुखी, जिभेला सूज येणे किंवा दातांमधील कॅव्हिटीच्या समस्यांमुळे होऊ शकते. जर तुम्हालाही हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर त्यावर काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातील काही वस्तू वापराव्या लागतील.

हिरड्यांमधून रक्तस्त्राव कसा थांबवायचा?

1. मीठ आणि गरम पाण्याने गार्गल करा

कोमट पाण्यात मीठ मिसळून गार्गल केल्याने हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते. हा उपाय हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

2. कडुलिंबाचे तेल

हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव थांबवण्यात कडुलिंबाचे तेल महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हिरड्यांवर लावू शकता आणि सकाळी स्वच्छ धुवा.

3. एलोवेरा ज्यूस

एलोवेरा ज्यूस देखील हिरड्यांमधून रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करू शकतो. तुम्ही कोरफडीची पाने कापून त्यातून काढलेला रस हिरड्यांवर लावू शकता.

4. ताजी फळे आणि भाज्या

ताजी फळे आणि भाज्या खाणे हिरड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहू शकते.

5. पाण्याचा योग्य वापर

हिरड्यांच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील ताजेपणा टिकून राहते आणि हिरड्या योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT