लाइफस्टाइल

Health Care News : रात्री उशीरा जेवल्याने हार्ट अटॅकचा वाढतो धोका, संशोधनात आले समोर

वेळेवर अन्न न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.

Aishwarya Musale

अनेकदा लोकांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे जेवण वेळेवर करता येत नाही. अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. काही लोकांना हे माहित असेल की उशिरा खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, परंतु ते किती धोकादायक असू शकते हे क्वचितच कोणाला माहित असेल.

वेळेवर अन्न न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हा धोका थोडासा नसून दर तासाला ६ टक्क्यांनी वाढतो. या अभ्यासात आणखी कोणते खुलासे झाले आहेत आणि कोणत्या प्रकारची दिनचर्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊया.

वेळेवर न खाण्याचा परिणाम

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचे कारण आहार आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अभ्यासानुसार, 2019 मध्ये एकूण 1.86 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू केवळ आहारामुळे झाला. म्हणजे वेळेवर अन्न न खाणे आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येत संतुलित आहाराचा समावेश न केल्याने मोठे आजार होतात.

उशिरा खाणे म्हणजे हृदयविकाराचा धोका

फ्रेंच रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, दिवसातील पहिले जेवण उशिरा केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हा धोका थोडासा नसून दर तासाला ६ टक्क्यांनी वाढतो. म्हणजेच वेळेवर जेवणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत 1 तास उशिरा जेवणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो.

जे रात्री 8 वाजता जेवतात त्यांच्या तुलनेत, जे लोक उशिरा जेवतात त्यांना हृदयविकाराचा धोका प्रति तास 6 टक्क्यांनी वाढतो. नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी 103,389 सहभागींच्या डेटाचा वापर करून खाण्याच्या पद्धती आणि हृदयरोग यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला.

या अभ्यासानुसार, दिवसातील पहिले जेवण (नाश्ता) सकाळी ८ वाजता केले पाहिजे. दुपारचे जेवण 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घ्यावे. संध्याकाळचा नाश्ता 5 वाजता घ्यावा. आणि रात्रीचे जेवण 8 वाजेपर्यंत केले पाहिजे. प्रत्येक सलग दोन मीलमध्ये सरासरी वेळेचे अंतर असावे याची विशेष काळजी घेतली पाहिजे. असे केल्याने ओव्हरइटिंगची समस्या टाळता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT