लाइफस्टाइल

Jaggery Milk : या कारणांमुळे हिवाळ्यात प्यावे गुळाचे दूध, आरोग्याच्या समस्या होतील दूर

गरम दूधामध्ये गूळ मिक्स करुन प्यायचे काय फायदे होतात हे घ्या जाणून...

Aishwarya Musale

दूध पिणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. पण विशेषतः हिवाळ्यात गरम दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. दुधात खजूर, तूप, मनुका अशा काही आरोग्यदायी गोष्टी घातल्यास दूध शरीराला अधिक फायदे देते.

हिवाळ्यात गुळाचे दूध प्यावे. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. हे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते आणि कमजोरी देखील दूर करते.

गुळाचे दूध पिण्याचे फायदे

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात गुळाचे दूध प्यायल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.

गुळामध्ये लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरस आढळतात. त्याच वेळी, दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते.

हे दोन्ही एकत्र प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो, पचनक्रिया सुधारते आणि मौसमी आजारांपासून बचाव होतो.

गूळ मिसळून दूध प्यायल्याने चयापचय वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

गुळाचा स्वभाव उष्ण असतो. त्यामुळे शरीराला आतून उष्णता मिळते.

हिवाळ्यात खोकला आणि सर्दी होत असेल तर हे जरूर प्या.

दुधात साखरेऐवजी गूळ घातल्यास लठ्ठपणाही कमी होतो.

यामुळे बद्धकोष्ठता होत नाही, अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि पोट सहज साफ होते.

यामुळे हाडे मजबूत होतात. ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी ते जरूर प्यावे.

ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी याचे सेवन अवश्य करावे.

यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.

गुळाचे दूध कसे तयार करावे?

गरम दुधात 1 तुकडा गुळ टाकून उकळवा.

महत्वाचे म्हणजे ते रात्री प्या.

तुम्ही आधी गुळाचा तुकडा खाऊन नंतर गरम दूध पिऊ शकता.

मात्र, दूधात गूळ मिसळून पिणे अधिक फायदेशीर ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेची तयारी! १,४५५ कोटींचे प्रकल्प, वाचा संपूर्ण यादी

Cricketer News: क्रिकेटपटूने दिली सोन्याची चेन... मात्र प्रेयसीने गहाण ठेवली; न्यायालयात पोहोचताच संपूर्ण कहाणी उलटली

खोटं रक्त आणि... असा शूट झाला 'सावळ्याची जणू सावली' मधला अमृताच्या अपघाताचा सीन; पाहा BTS व्हिडीओ

Satara News: साताऱ्यातील ‘कास’वर अवैध उत्खनन; तहसीलदारांची व्यावसायिकाला दंडाची नोटीस

Kolhapur Tourist Death : राधानगरीत Engineering महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा दूधगंगेत बुडून मृत्यू; कांबळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT