लाइफस्टाइल

Beetroot Juice : आरोग्यासाठी फायदेशीर आहे बीटरुटचा ज्यूस, पण 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये, कारण...

या लोकांनी चुकूनही बीटरूटचा ज्यूस पिऊ नये, कारण...

Aishwarya Musale

बीटरूट एक सुपर फूड आहे, त्याचा आहारात समावेश करून खूप फायदे मिळतात. हिवाळ्यात लोकांना बीटरूट खायला आवडते. हे केवळ रक्तदाब मेंटेन करत नाही तर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते.

याशिवाय अॅनिमियाही दूर होतो. एकूणच, याचे अगणित फायदे आहेत, परंतु काही आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी बीटरूटचा रस अजिबात पिऊ नये. चला जाणून घेऊया बीटरूट ज्यूस पिण्याने कोणत्या लोकांना नुकसान होऊ शकते.

कोणत्या लोकांनी बीटरूटचा ज्यूस टाळावा?

ज्या लोकांना किडनीचा आजार आहे, त्यांनी बीटरूटचा रस पिऊ नये. कारण त्यात ऑक्सलेट नावाचे एक संयुग आढळते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या आणखी वाढू शकते.

जर तुम्ही आधीच लो बीपीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही बीटरूटचा रस टाळावा. बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते जे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी चांगले असते. परंतु जर तुमचे बीपी आधीच कमी असेल तर त्यामुळे बेहोश होणे, चक्कर येणे आणि उलट्या होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बीटरूटचा रस पिऊ नये. बीटरूटमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असलेल्यांनी त्याचे सेवन टाळावे.

तुम्‍हाला इरिटेबल बोवेल सिंड्रोमचा त्रास असला तरीही, तुम्ही बीटरूट ज्यूस टाळावा, कारण त्यात नायट्रेट असते आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात पेटके येऊ शकतात.

जर तुम्हाला यकृताची समस्या असेल किंवा तुम्हाला स्किन ऍलर्जीची समस्या असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही बीटरूटचा रस पिणे टाळावे. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT