लाइफस्टाइल

Low Blood Sugar : तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे की नाही? 'ही' लक्षणे दिसत असतील तर वेळीच व्हा सावध

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे की नाही? जाणून घ्या

Aishwarya Musale

मधुमेह हा आता सर्वसामान्य आजार झाला आहे. एकदा का जर मधुमेह झाला तर त्यातून सुटका होणे अशक्य आहे. मात्र, योग्य जीवनशैलीचे पालन करून मधुमेहाला नियंत्रणात ठेवता येते. WHO च्या मते, मधुमेहाची समस्या ही जगातील गंभीर समस्यांपैकी एक आहे.

खरंतर हा आजार वाढला की यावर मार्ग शोधले जातात. पण, जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते, तेव्हा त्याची काही लक्षणे दिसू लागतात. चला जाणून घेऊया त्या लक्षणांबद्दल.

ही आहेत लक्षणे

रक्तातील साखर कमी झाल्यास डोकेदुखी होते.

थरथरणे, चक्कर येणे, भूक, चिडचिड, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा पिवळी पडणे, घाम येणे आणि अशक्तपणा हे देखील लो शुगरची लक्षणे आहेत.

ब्लड शुगर लो झाल्यावर वेळीच उपचार न केल्यास कोमात जाण्याचा धोका असतो.

ब्लड शुगर कमी का होते?

लो ब्लड शुगर अनेक कारणांमुळे होऊ शकते.

औषधे आणि इन्सुलिन इंजेक्शन्सच्या अतिवापरामुळे साखरेची पातळी कमी होऊ शकते.

मधुमेही रुग्णांनी अन्न वगळल्यास किंवा कमी खाल्ल्यास रक्तातील साखर कमी होऊ शकते.

या टिप्स फॉलो करा

1. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज ब्लड शुगर चेक करा.

2. घरातून बाहेर पडण्यापूर्वी नाश्ता करा.

3. रक्तातील साखर कमी असताना कार्बोहायड्रेटयुक्त स्नॅक्स खा.

4. रक्तातील साखर कमी असल्यास ती वाढवण्यासाठी मिठाई किंवा चॉकलेट खाऊ नका. साखर, गूळ, ग्लुकोज पावडरचे सेवन करा.

5. तुम्ही अर्धा कप फळांचा रस पिऊ शकता.

6. एक कप दूध प्या. तुम्ही एक चमचा मध देखील घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT