malaika arora sakal
लाइफस्टाइल

Health Care News: मलायका अरोरा सारखी झीरो फिगर हवीये? मग ट्राय करा ही योगासने!

तुम्हालाही मलायकासारखा फिटनेस हवा असेल तर तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये या योगासनांचा समावेश करा.

Aishwarya Musale

बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या वाढत्या वयासोबत पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि तरुण दिसतात. या यादीत मलायका अरोराच्या नावाचाही समावेश आहे. 20 वर्षांच्या मुलाची आई असलेल्या 49 वर्षांच्या मलायकाकडे पाहून तिच्या खऱ्या वयाचा कोणीही अंदाज लावू शकत नाही.

या वयातही ती इतकी तंदुरुस्त दिसते की जवळजवळ प्रत्येक स्त्रीचे तिच्यासारखे फिगर आणि चेहऱ्यावर चमक येण्याचे स्वप्न असते. तुम्हालाही मलायकासारखा फिटनेस हवा असेल तर तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये या योगासनांचा समावेश करा.

मलायका स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करते आणि योगा सेशन कधीही चुकवत नाही. ती तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या योगासनांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा शेअर करत असते आणि त्यांचे फायदेही सांगत असते.

मरीच्यासन 

मलायका स्वतःला फिट ठेवण्यासाठी हा योग करते. हे योगासन केल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होते, तणाव कमी होतो आणि पाठीचा कणा मजबूत होतो. याव्यतिरिक्त, ते पचन मजबूत करते आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करते. याशिवाय ते चेहऱ्याची निखारता वाढवते.

गोमुखासन 

मलायकाच्या मते, “हे योग हिप्‍सवर काम करते आणि मणक्याचे आरोग्य सुधारते. याशिवाय, असे केल्याने फुफ्फुसे चांगले काम करतात. तसेच खांद्यावरील कडकपणा दूर होतो.

चक्रासन 

मलायका स्वतःला फिट ठेवण्यासाठी चक्रासन देखील करते. हे योग आसन शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "असे केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो, मानसिक आरोग्य चांगले असते, तणाव दूर होतो आणि मनावर शांत प्रभाव पडतो." तसेच पोट आणि कंबरेची चरबी कमी होऊन चेहऱ्यावर चमक येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

AUS W vs ENG W Final: आज महिला टी-20 विश्वचषक फायनल; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल मॅच... महामुकाबला

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

SCROLL FOR NEXT