Health Care  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; आजच फॉलो करा या टिप्स

जगभरात मानसिक आरोग्यासंदर्भातील तक्रारी वाढत आहेत.

Aishwarya Musale

८० टक्के नागरिक उपचाराविना; जागरूकतेचा अभाव, कलंक कारणीभूत

जगभरात मानसिक आरोग्यासंदर्भातील तक्रारी वाढत आहेत. मात्र, मानसिक आरोग्याकडे आजही म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या भारतीयांपैकी सुमारे ८० टक्के जण उपचार घेत नाहीत. जागरूकतेचा अभाव, दुर्लक्ष व मानसिक आजारांवर कलंक असल्याने सहजतेने उपचार घेतले जात नाहीत, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मानसिक आरोग्याची व्यापकता लक्षात घेऊन वेळेवर मदत घेण्यासाठी शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही शिक्षणप्रणालीचा अविभाज्य भाग असायला हवा, असेही मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

‘एम्स’ मधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार म्हणाले, की मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यापासून वेगळे केले जाऊ शकत नाही आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळता येत नाही. त्यामुळे, शाळा आणि महाविद्यालय स्तरावरच मन आणि शरीराच्या नात्याबद्दल जागरूकता वाढविण्याची गरज आहे.

त्यामुळे, मानसिक आरोग्याच्या समस्यांचे लवकर निदान होऊ शकेल. लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव आहे. अनेकवेळा मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या दुर्लक्षितच राहतात. लक्षणांना सुरूवात झाल्यावर प्रत्यक्ष उपचार सुरू करण्यातील कालावधी बराच मोठाअसल्याने गुंतागुंत वाढत जाते.

संबंधित व्यक्ती आजारी आहे, हे आपण जोपर्यंत ओळखतच नाही तोपर्यंत त्या व्यक्तीवर उपचार कसे करणार, असा सवालही त्यांनी केला. मानसिक आजारांचा परीघ व्यापक असून त्यात निद्रानाश, सौम्य चिंता विकार आणि नैराश्य, तीव्र मूड विकार आदींचा समावेश होतो.

त्यामुळे, रुग्णाला आपला नेमका आजार कोणता आहे किंवा मुळात आजार आहे का, हे ओळखणे अवघड जाते. युवकांमध्येही मनोविकारांचे प्रमाण मोठे असून पौगंडावस्थेतील समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष होते. त्याचप्रमाणे, मानसिक आजारांवरील कलंक आणि भेदभाव लोकांना उपचार घेण्यापासून परावृत्त करतो, असेही त्यांनी सांगितले.

मानसोपचारतज्ज्ञ सृष्टी अस्थाना यांनी मानसिक आजारांवरील उपचाराचा खर्च व लागणारा प्रदीर्घ वेळ आदींमुळेही लोक पुढे येत नसल्याचे अधोरेखित केले.

शारीरिक व मानसिक सक्रियता गरजेची

खासगी रुग्णालयांत उपचाराचा खर्च अधिक असून सरकारी रुग्णालयांतील गर्दीमुळे लोक उपचार घेण्याचे टाळतात. त्याचप्रमाणे, मानसोपचारतज्ज्ञांची अपुऱ्या संख्येचा मुद्दाही त्यांनी मांडला. मात्र, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केवळ मनोविकारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांची संख्या वाढवून थांबणार नाहीत तर सामाजिक एकसंधतेला प्रोत्साहन, शारीरिक व मानसिक सक्रियता व सांस्कृतिक एकात्मता हे मुद्देही महत्त्वाचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सृष्टी अस्थाना यांनी सांगितले.

देशातील मनोविकारतज्ज्ञ

६,०००

२०१६

९,०००

२०२३

आत्महत्या

१.३० लाख

२०१६

१.६४ लाख

२०२३

आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या

खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. म्हणूनच सर्व लोकांना निरोगी आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

शरीराच्या इतर भागांप्रमाणेच, आपल्या मेंदूला निरोगी राहण्यासाठी आणि चांगले कार्य करण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरयुक्त गोष्टींचे प्रमाण वाढवा. प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले खाद्यपदार्थ टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT