लाइफस्टाइल

Health Care News : तुम्हीही तणावात आहात का? स्ट्रेस फ्री राहायचंय तर करा हे सोपे उपाय

स्ट्रेस फ्री राहायचंय तर करा हे सोपे उपाय..

Aishwarya Musale

आजच्या काळात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावात असतो. पण जेव्हा तुमच्या कामावर परिणाम होऊ लागतो आणि तुम्हाला झोप येण्यास त्रास होतो तेव्हा ही समस्या तुम्हाला अधिक त्रास देऊ लागते. यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला तणावापासून दूर राहण्यासाठी अनेक उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तणावपूर्ण परिस्थितीतही स्वतःला शांत ठेवू शकता

नेहमी घरचे अन्न खा

तुम्ही नेहमी पौष्टिक आणि घरी बनवलेलं अन्न खा. जेव्हा तुम्ही बाहेरचे तळलेले अन्न खाता तेव्हा लिपिड मेटाबॉलिजम कमी होते आणि न्यूरो इन्फ्लेमेशन वाढते. जेव्हा तुम्ही घरी बनवलेले अन्न खाता तेव्हा तुम्हाला योग्य मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी मिळते जे तणाव आणि मूड नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात. त्याच वेळी, बाहेरचे अन्न खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता, ज्यामुळे तुम्हाला चिडचिड आणि अशक्तपणा येतो.

थोडा वेळ उन्हात बसा

तणाव कमी करण्यासाठी, तुम्ही दररोज किमान 10 मिनिटे सूर्यप्रकाशात बसले पाहिजे. हे विशेषतः हिवाळ्याच्या हंगामात करणे आवश्यक आहे कारण सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे सेरोटोनिन हार्मोनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्य वाढू शकते.

सोशल मीडियावर कमी वेळ घालवा

तणाव कमी करण्यासाठी, सोशल मीडियाचा वापर कमी करा. खरं तर, जेव्हा आपण सोशल मीडियाचा जास्त वापर करतो, तेव्हा त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो. झोपेवरही परिणाम होतो. आणि अनेकवेळा आपण सोशल मीडियाच्या पोस्ट्स पाहून तसं बनण्याचा प्रयत्न करतो. लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याचा प्रयत्न केल्याने चिडचिडेपणा आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवतात आणि याचा परिणाम अनेकांच्या मानसिक आरोग्यावर होतो.

शांत ठिकाणी बसा

तुमचे मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी, शांत ठिकाणी बसा, अगदी थोड्या काळासाठी का होईना. याच्या मदतीने तुम्ही शरीर आणि मन यांच्यात संतुलन निर्माण करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: अखेर बिहारमध्ये रणशिंग फुंकलं! निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

फक्त सिंधुताई माझी माईच नाही तर या निर्मिती संस्थांमध्येही गैरव्यवहार ! पारू फेम अभिनेत्याने नावंच जाहीर केली

Best Credit Cards For Women: महिलांसाठी बेस्ट आहेत 'हे' क्रेडिट कार्ड, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं आहे योग्य

Jasprit Bumrah: '...तर कदाचित बुमराह कधी गोलंदाजी करू शकला नसता', मोहम्मद सिराजने उलगडलं बुमराहच्या 'वर्कलोड'चं कोडं

SCROLL FOR NEXT