Weight sakal
लाइफस्टाइल

Right Time To Check Weight: तुम्हाला माहीत आहे का? आपलं वजन चेक करण्याचीही वेळ असते! जाणून घ्या

अनेकदा वेट लॉस किंवा वेट गेन करत असताना कोणत्या वेळी वजन तपासायचं हा प्रश्न पडतो.

Aishwarya Musale

वजन वाढवायचे असो किंवा वजन कमी करायचे असो, तुम्ही खाण्या-पिण्यात जेवढे जास्त प्रयत्न करता, तेवढाच व्यायाम देखील करता, तुमचे वजन नीट चेक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा वजन चेक करण्यासाठी वेट मशीनचा वापर केला जातो.

काहीवेळा असेही वाटते की जास्त खाल्ल्याने मशीन जास्त वजन सांगत आहे. मात्र, असे होत नाही. काही दिवसांपूर्वी न्यूट्रिशनिस्ट अपूर्व अग्रवालने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने वजन कसे आणि कधी तपासायचे हे सांगितले होते. जाणून घेऊया...

वीकेंड नंतर वजन तपासू नका

वीकेंडमध्ये बहुतेक लोक आवडत्या गोष्टी खातात आणि व्यायाम स्किप करतात. अशा स्थितीत वीकेंडनंतर वजन चेक केले तर योग्य माप सापडत नाही. जेव्हा जास्त वजन असते तेव्हा आत्मविश्वासाची कमतरता असते, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

व्यायामानंतर लगेच वजन चेक करणे टाळा

वर्कआउट केल्यानंतर लगेचच वजन चेक केले तर ते बरोबर कळत नाही. व्यायामाने शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो. यामुळे वजनाचे मोजमाप बरोबर येत नाही.

वजन चेक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ

जर तुम्हाला तुमचे वजन चेक करायचे असेल असेल तर वजन तपासण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी. यावेळी, फ्रेश झाल्यानंतर, आपण आपले वजन चेक करू शकता. यासाठी मशीनवर नीट उभे राहणेही आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT