लाइफस्टाइल

Period Remedies : रोज खा भिजवलेले काळे मनुके, मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होतील

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान आहेत काळे मनुके...

Aishwarya Musale

मासिक पाळीशी संबंधित समस्या अनेकदा महिलांना अडचणीत आणतात. निरोगी राहण्यासाठी महिलांचे मासिक पाळीचे आरोग्य चांगले असले पाहिजे. योग्य वेळी मासिक पाळी येणे, जास्त वेदना न होणे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

बहुतेक स्त्रिया मासिक पाळीशी संबंधित काही समस्यांमुळे त्रस्त राहतात. जर तुम्हाला मासिक पाळी अनियमित होण्याची समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, यामध्ये काही घरगुती उपायही उपयुक्त ठरू शकतात. काळे मनुके मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

काळे मनुके मासिक पाळीच्या समस्या दूर करतात

भिजवलेले काळे मनुके खाणे महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या पाण्याने महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

काळे मनुके हार्मोनल असंतुलन दूर करतात. हार्मोनल असंतुलन हे मासिक पाळीशी संबंधित समस्यांचे मुख्य कारण आहे. अशा परिस्थितीत काळे मनुके खाल्ल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.

काळ्या मनुकामध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

ॲनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेमुळेही मासिक पाळीत जास्त वेदना होतात. अशा स्थितीत काळे मनुके तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

काळे मनुके भिजवून खाऊन आणि त्याचे पाणी प्यायल्याने लोहाची पातळी सुधारण्यास मदत होते.

हे नॅच्युरल ब्लड प्यूरिफायर आणि डिटॉक्सिफायर आहे. हे मासिक पाळी दरम्यान वेदना, पेटके बरे करू शकते.

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान ब्लड क्लॉट्स जास्त होतात, अशा परिस्थितीत तुम्ही मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधीपासून ते घेणे सुरू करावे. मासिक पाळी सामान्य होईल.

मासिक पाळीमध्ये आराम मिळण्यासाठी काळे मनुके कसे खावेत?

याचे रोज सेवन करणे देखील फायदेशीर आहे. परंतु जर तुम्ही ते रोज घेऊ शकत नसाल तर मासिक पाळी येण्याच्या 10 दिवस आधी ते घेणे सुरू करा

रोज ४-५ काळे मनुके भिजवा.

सकाळी उठल्यानंतर ते खा आणि त्याचे पाणी प्या.

तुम्हाला फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT