Pregnancy  sakal
लाइफस्टाइल

Pregnancy Complications: गरोदरपणात पोटात दुखत असेल तर करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या!

गरोदरपणात शरीराच्या कोणत्याही भागात दिसणार्‍या असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Aishwarya Musale

गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. परंतु या काळात त्यांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. महिलांसाठी आई बनणे खूप कठीण असते. या काळात त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. अशा परिस्थितीत महिला गरोदरपणात होणाऱ्या प्रत्येक बदलाला सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.

गर्भधारणेदरम्यान काय सामान्य आहे आणि आपल्यासाठी काय हानिकारक आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आज आपण अशा काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत, जे गर्भधारणेदरम्यान काही गंभीर समस्या दर्शवतात, परंतु त्याआधी आपण त्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत जे या काळात सामान्य असतात.

गर्भधारणेची काही सामान्य लक्षणे

गॅस

उलट्या

मळमळ

सौम्य वेदना

छातीत जळजळ

रात्री पाठदुखी किंवा पायात सतत गोळे  येणे

चेहरा, हात, पाय आणि घोट्याला सूज येणे

गर्भधारणेची इतर सामान्य लक्षणे

गर्भधारणेदरम्यान उद्भवणारी ही सर्व लक्षणे सामान्य आहेत. याचा अर्थ असा नाही की आपल्याला या समस्यांना तोंड द्यावे लागेल. या समस्या आणि लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. याशिवाय गरोदरपणात तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागू शकते. तुमच्या हिरड्या देखील सुजल्या जाऊ शकतात, ज्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. त्याच वेळी, त्वचेतील बदलांमध्ये चेहऱ्यावर डाग, स्ट्रेच मार्क्स किंवा वैरिकास व्हेन्स यांचा समावेश होतो.

गर्भाशयाच्या वाढीची कारणे

गर्भाशयाच्या वाढीमुळे देखील पोटदुखी होते. उलट्या होण्याचीही यासोबतच शक्यता असते. तुम्ही यासाठी सतत काही ना काही कमी प्रमाणात खात राहणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

यूरिनमार्गाच्या भागात होणारे इन्फेक्शन

यूरिनमार्गाच्या भागात होणारे इन्फेक्शन कडे गर्भधारणेदरम्यान दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्यामुळे पोटदुखी, जळजळ होणे, उलट्या होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. वेळीच याची काळजी घेतली नाही, तर पुढे किडनीला इन्फेक्शन होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT