Health  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: या सवयी आहेत तुमच्या आरोग्याच्या शत्रू, फिट राहायचे असेल तर आजच करा त्यांना गुडबाय!

अनेक वेळा वजन वाढण्याचे कारण फक्त अन्नच नाही तर काही वाईट सवयी आहेत.

Aishwarya Musale

आजच्या काळात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. काहींना लठ्ठपणा तर काहींना मधुमेहाचा त्रास आहे. या सर्व समस्यांना आपणच जबाबदार आहोत. आपल्याला अशा काही सवयी असतात ज्या हळूहळू आपले आरोग्य बिघडवत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. आज आपण आपल्या त्या तीन सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपले आरोग्य बिघडवत आहेत.

ज्या सवयी तुमचे आरोग्य खराब करतात

रात्रीचे खराब रूटीन

तुमचे रात्रीचे खराब रूटीन तुमच्या खराब आरोग्यासाठी जबाबदार आहे. यामध्ये रात्रीचे जेवण वेळेवर न करणे, रात्री उशिरा झोपणे किंवा न झोपणे, मध्यरात्री स्नॅक्स खाणे, रात्री उशिरा फोन वापरणे आणि पहाटे ४ वाजता झोपणे यांचा समावेश होतो.

यामुळे तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता, हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि मेंदूचे कार्य बिघडू शकते.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी

तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीचाही तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे जसे की नाश्ता किंवा जेवण वेळेवर न करणे, या व्यतिरिक्त तुम्ही जास्त प्रमाणात खाणे, फास्ट फूड आणि पॅक केलेले अन्न खाणे किंवा प्रत्येक वेळी काहीतरी खाणे, पाणी कमी पिणे. यामुळे तुमचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊ शकते. या सवयी तुम्हाला भविष्यात गंभीर आजारी बनवू शकतात.

नकारात्मक विचार

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा चुकीच्या दिनचर्येचाही आरोग्यावर परिणाम होत नाही. तर, तुमच्या नकारात्मक विचारांचा तुमच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. खूप विचार करणे, गोष्टींची काळजी करणे, रागावणे हे देखील तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य खराब करू शकते. भविष्यात तुम्ही मानसिक आजाराला बळी पडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

Pune News : भाजपच्या आणखी दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर; शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

SCROLL FOR NEXT