लाइफस्टाइल

Health Care News : 'या' 6 प्रकारच्या पदार्थांच्या सेवनाने वाढतो मूळव्याधाचा त्रास! जाणून घ्या

मूळव्याधाने आहात त्रस्त ? मग 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

Aishwarya Musale

चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मूळव्याधची समस्या उद्भवते. या आजाराचे सर्वात मोठे कारण म्हणजे बद्धकोष्ठता. ही खूप सामान्य समस्या बनली आहे. मूळव्याध झाल्यास त्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो, अनेक वेळेस असह्य वेदनाही होतात.

तसेच यामुळे रक्तस्त्राव होतो आणि उठणे-बसण्यास त्रास होतो. आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात खाण्यापिण्याची काळजी घेतली तर या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. मूळव्याधाचा त्रास असेल तर काही पदार्थ खाणे टाळणे हे अत्यंत गरजेचे आहे.

मूळव्याधाचा त्रास असेल तर हे पदार्थ टाळा

मुळव्याधची समस्या असल्यास कॉफी आणि चहाचे सेवन अजिबात करू नये, कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन मोठ्या प्रमाणात आढळते. कॅफिनमुळे शरीराचे निर्जलीकरण होऊ शकते, त्यामुळे मलविसर्जनात अडचण येते आणि अशावेळी मूळव्याधची लक्षणे तीव्र होतात.

मैद्यापासून बनवलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करू नये. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते, जे पचायला सोपे नसते. त्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. आणि मूळव्याधची लक्षणे वाढू शकतात.

मूळव्याधाचा त्रास होत असेल तर मसालेदार पदार्थ टाळावे. त्यामुळे पचनक्रियाही बिघडते. त्याचसोबत जळजळ होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमीत कमी खावेत.

लाल मांस आणि अंडी यांसारखे उच्च प्रथिनयुक्त आहार देखील टाळावा. प्रथिनांचे सेवन केल्याने पचन बिघडू शकते. प्रथिने नीट पचत नाहीत, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि वेदना होतात.

मूळव्याधाचा त्रास होत असेल तर त्यांनी मसूर डाळ खाणे देखील टाळावे. कारण त्यात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. ते पचायला कठीण असतं. यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते, जी मूळव्याधच्या रुग्णांसाठी खूप हानिकारक आहे.

धूम्रपान करणे तसेच गुटखा खाणे हे देखील शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. यामुळे मूळव्याधाचा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे मूळव्याधापासून सुटका हवी असेल तर धूम्रपामन करणे तसचे गुटखा खाणे या सवयी ताबडतोब बंद कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अघोरी कृत्य! २७ दिवसांच्या बाळाच्या पोटावर चटके, आठवड्याभरात दुसरी घटना; नेमकी अंधश्रद्धा काय?

Pune News : वैद्यकीय शिक्षण विभागातील अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्‍वासन

W,W,W,W,W! पाच चेंडूंत पाच विकेट्स; २६ वर्षीय गोलंदाजाचा क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, जगातला पहिलाच खेळाडू, Video Viral

Harjeet Singh Laddi: मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अन्...; कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबाराची जबाबदारी स्विकारणारा हरजीत सिंग लड्डी कोण?

धक्कादायक! सहा वर्षांच्या चिमुकलीचं ४५ वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं; तालिबानी म्हणाले, ९ वर्षांची होईपर्यंत वाट पाहा

SCROLL FOR NEXT