Yogasan  sakal
लाइफस्टाइल

Yogasan : जर तुम्हाला तुमच्या मुलांची उंची वाढवायची असेल तर आजपासूनच करा 'हे' योगासन

तुमच्या मुलाची उंची वाढत नाही का? 'हे' योग प्रकार ट्राय करा फरक दिसेल

Aishwarya Musale

आपल्या व्यक्तिमत्वाची छाप समाेरच्या व्यक्तीवर पाडायची असेल, तर त्यात आपल्या उंचीची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे आपल्या मुलांची उंची खूप जास्त नसली तर त्यांना काळजी वाटते. अनेक पालक आपल्या मुलांच्या उंचीबद्दल खूप काळजीत असतात. ते प्रत्येक गोष्ट करतात ज्यामुळे त्यांच्या मुलाची उंची वाढेल.

अशावेळी तुम्ही त्याच्या दैनंदिन खाण्यातील दिनचर्येत काही बदल करु शकता. तसेच यावर एक सर्वोत्तम उपाय म्हणून तुम्ही त्याला काही योगासनांची सवय लावू शकता. अनेकवेळा एखाद्याची उंची ही अनुवांशिकता यावर आधारित असू शकते.

2 वर्षांच्या वयानंतर मुलांची उंची दरवर्षी 2.5 इंचाने वाढते. जेव्हा मुलांमध्ये तारुण्य येते तेव्हा त्यांची उंची अधिक वेगाने वाढते. आणि मुलींची उंची वाढणे खुंटायला सुरु होते.

सर्व वयोगटातील लोकांनी योगा करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे योगासन करणे हे जीवनशैलीत समावेश केला पाहिजे. योगाद्वारे उंची वाढवण्याचे गुणधर्म आज आपण जाणून घेणार आहोत.

म्हणूनच मुलांची उंची वाढत नसेल, तर त्यांच्या पालकांना चिंता वाटू लागते. तुमच्याही मुलांची उंची कमी असेल, तर त्यांना पुढील काही योगासने नियमितपणे करायला लावा. उंची वाढण्यास निश्चितच मदत होईल.

एकपादासन योग

जर तुम्हाला तुमच्या मुलाची उंची चांगली असावी किंवा वाढावी असे वाटत असेल तर त्याला रोज एकापदासन हा योग प्रकार करायला सांगा. यासाठी सुरुवातील सरळ उभे राहणे गरजेचे आहे. यानंतर तुमचा उजवा पाय उचलून स्नायू आणि पाठीचा कणा मजबूत होईल.

यासाठी सुरुवातील सरळ उभे राहा. तुमचा उजवा पाय उचला आणि डाव्या मांडीला हलवत रहा. यानंतर डाव्या पायावर शरीराचे वजन संतुलित ठेवा. उजवा पाय तुमच्या ओटीपोटाच्या जवळ ठेवा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात वरच्या बाजूला जोडून तुम्हाला सूर्यनमस्काराच्या आसनात उभे राहावे लागेल.

ताडासन

हा आसन प्रकार करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. मग आपले पाय एकत्र करून यानंतर दोन्ही हात बाजूला ठेवावे लागतील. मग आपले तळवे वर करून यानंतर श्वास घेताना दोन्ही बोटांच्या बळावर उभे राहून शरीराला वर खेचावे. मग सामान्य स्थितीत या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT