लाइफस्टाइल

Health Care News : हिवाळ्यात सतत दातदुखीचा त्रास होतोय ? मग हे उपाय करून पाहा

दातदुखी ही एक सामान्य समस्या आहे, परंतु कधीकधी ही समस्या इतकी वाढते की त्यामुळे होणाऱ्या वेदना असाह्य होतात.

Aishwarya Musale

हिवाळ्यात शरीरासोबतच ओरल हेल्‍थचीही काळजी घ्यायला हवी. थंड आणि कोरडे वारे आणि वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावरच नाही तर दातांवरही होतो. याशिवाय हिवाळ्यात खूप गोड खाल्ल्याने दात आणि हिरड्यांवर वाईट परिणाम होतो आणि कॅव्हिटी आणि दात सेंसिटिव्हीटीची समस्या वाढते.

जर तुम्हाला हिवाळ्यात दातांचा त्रास होत असेल तर काळजी करू नका कारण तुमच्या दातांचे आरोग्य तुमच्या हातात आहे. या काही सोप्या उपायांनी तुम्ही हिवाळ्यात तुमच्या ओरल हेल्‍थचे रक्षण करू शकता.

हायड्रेटेड रहा

हिवाळ्यात बहुतेक लोक कमी पाणी पितात, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या सुरू होते. त्यामुळे स्‍लाइवा कमी तयार होते. स्‍लाइवा अ‍ॅसिड कमी करण्यास आणि निरोगी पीएच संतुलन राखण्यास मदत करते.

म्हणूनच, हिवाळ्यात दातांना आणि हिरड्यांना हानी पोहोचवणारे बॅक्टेरिया टाळण्यासाठी, पुरेसे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट करा. ही सोपी सवय तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर ओरल हेल्‍थठीही चांगली आहे.

ओरल हाइजीनची काळजी घ्या

हिवाळ्यात, बहुतेक लोक तोंडाच्या स्वच्छतेबद्दल निष्काळजी होतात, हे करणे टाळा. फ्लोराईड-मुक्त टूथपेस्ट आणि सॉफ्ट-ब्रिस्टल टूथब्रशने दिवसातून किमान दोनदा दात घासावेत.

तुमच्या दातांमधील प्लाक आणि घाण काढून टाकण्यासाठी दररोज फ्लॉस करायला विसरू नका. याशिवाय अँटी सेप्टिक माउथवॉश वापरून तुम्ही तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करू शकता.

ओठ आणि हिरड्यांचे संरक्षण करा

थंड वाऱ्यामुळे ओठ फुटू लागतात आणि हिरड्या संवेदनशील होतात. त्यामुळे तुमच्या ओठांचे रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना एसपीएफ असलेला चांगल्या दर्जाचा लिप बाम लावा. तसेच, तुमचे दात किंवा हिरड्या संवेदनशील असल्यास, अस्वस्थता टाळण्यासाठी मऊ ब्रिस्टल्ससह टूथब्रश वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT