लाइफस्टाइल

Exercise To Avoid Laziness : हिवाळ्यात या स्ट्रेचिंग एक्सरसाइजने दिवसाची सुरुवात करा, आळस होईल दूर

आज आम्ही तुम्हाला अशा चार व्यायामांबद्दल सांगत आहोत जे सकाळी केले तर तुम्ही दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहाल.

Aishwarya Musale

हिवाळ्याच्या दिवसात सकाळी लवकर उठायचं म्हंटल की नको वाटतं. त्यामुळे अनेक वेळा काही कामात विलंब होतो. अनेकदा आपल्याला ऑफिस किंवा कॉलेजला जायलाही उशीर होतो. जर तुम्हीही हिवाळ्याच्या मोसमात अशाच आळसाचे बळी ठरलात तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन व्यायामांबद्दल सांगत आहोत जे सकाळी केले तर तुम्ही दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहाल.

आळस दूर करण्यासाठी हे 3 व्यायाम करा

शोल्डर स्ट्रेच

सर्वप्रथम शोल्डर स्ट्रेच करा. यामुळे शोल्डरची लवचिकता वाढते आणि रक्ताभिसरणही सुधारते, त्यामुळे तुमच्या हाताचे स्नायू सक्रिय होतात आणि तुम्ही काम करण्यास तयार होतात. तुम्ही बेडवर बसूनही हा व्यायाम करू शकता.

यासाठी तुम्हाला तुमचे खांदे एकदम सरळ ठेवावे लागतील, तुमचा उजवा हात वर उचलून सरळ करा. आता डाव्या हाताने उजवा हात धरून डावीकडे खेचा आणि छातीजवळ आणा. त्याचप्रमाणे, सुमारे 30 सेकंद धरून ठेवा आणि दुसऱ्या हाताने तेच करा.

पाय स्ट्रेच करा

आता लेग स्ट्रेच व्यायाम करा. यासाठी दोन्ही हात भिंतीवर छातीसमोर ठेवा. नंतर शरीराचे वजन उजव्या पायावर ठेवून डावा पाय उचला. गुडघ्याजवळ वाकून, टाच नितंबांच्या जवळ आणा, नंतर पाय खाली करा. दुसऱ्या पायानेही असेच करा.

सुखासन

सुखासन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. सुखासन करण्यासाठी मांडी घालून बसा आणि पाठीचा कणा एकदम सरळ ठेवा. लक्षात ठेवा हे आसन करताना हातांच्या मुद्रेची विशेष काळजी घ्या.

काही काळ या आसनात बसल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. तर सुखासन केल्यामुळे शरीरातील रक्त-प्रवाह समांतर स्वरुपात चालू राहतो. ज्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात उर्जा निर्माण होते. तसेच सुखासन केल्यामुळे लठ्ठपणा, पित्त, पोटांचे विकार यांपासून बचाव होतो.

कोब्रा योगा

स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणून तुम्ही कोब्रा योगा पोझमध्ये बसण्याचाही प्रयत्न करू शकता. तुम्ही एक्सरसाइज बॉल वापरून तुमच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना वाकून स्ट्रेचिंग देखील करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT