लाइफस्टाइल

Winter Health Care : नाक बंद झाल्यामुळे त्रास होतोय? मग या घरगुती उपायांनी आराम मिळेल

सर्दीमुळे नाक बंद होत असेल तर करा हे घरगुती उपाय

Aishwarya Musale

हिवाळ्यात प्रचंड प्रमाणात गारवा असतो. या हंगामात अनेक आजार डोके वर काढतात. थंडी आणि सर्दीमुळे नाक बंद होण्याची समस्या होते. यामुळे एखाद्याला खूप अस्वस्थ वाटते. रात्री झोपतानाही त्रास होतो. कधीकधी श्वास घेणे देखील कठीण होते. जर तुम्हालाही नाक बंद होण्याच्या समस्येने त्रास होत असेल, तर आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या नाक बंद होत असेल तर त्यापासून सहज सुटका मिळवण्यासाठी मदत करेल.

1. ज्या लोकांना नाक बंद होण्याची समस्या जाणवते त्यांनी 4-5 मिनीटे कांद्याच्या सालीचा वास घ्यावा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. कांद्याच्या सालीत असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचे नाक बंद होण्यापासून तुमचे संरक्षण होते.

2. तुम्हा कांद्याचा रस देखील वापरू शकता. यामुळे नाक बंद होण्याच्या समस्याही दूर होतात. यासाठी लाल कांद्याचा रस काढून त्याचे काही थेंब नाकात टाकावे लागतील. असे केल्यास त्याचा लाभ लगेच मिळेल.

3. कांद्यामध्ये नाकातील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करणारे गुणधर्म आहेत. त्याचा वापर केल्यास नाकाच्या पडद्याला आलेली सूज कमी होते, त्यामुळे नाकातील अडथळे दूर होतात.

4. नाक बंद असल्यास वाफ घेणे हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी पाणी गरम करून त्यात विक्स टाका आणि नंतर संपूर्ण डोके टॉवेलने झाकून वाफ घ्या. सर्दी आल्यावर रात्री नाक आणि छातीवर विक्स लावून झोपणे देखील फायदेशीर आहे.

5. नाक बंद होण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि काळी मिरीचे सेवन करणे हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे. यासाठी दोन चमचे मधात दोन चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून खा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT