लाइफस्टाइल

Grapes Health Benefits : पचन चांगले होण्यापासून ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यापर्यंत... रोज द्राक्षे खाण्याचे अगणित फायदे

तंदुरुस्त राहण्यासाठी खा द्राक्षे, जाणून घ्या त्याचे फायदे

Aishwarya Musale

फळे आणि भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले गुणधर्म पचन, त्वचा, हृदय आणि इतर अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे आहारात यांचा समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. विशेषत: हंगामी फळे आणि भाज्या तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात हंगामी भाज्या आणि फळे खाणे आवश्यक आहे. हिवाळ्यात मिळणारी द्राक्षे चवदार तर असतातच शिवाय आरोग्यदायीही असतात. तुमच्या रोजच्या आहारात याचा समावेश करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता.

हिवाळ्यात रोज द्राक्षे का खावीत?

  • तज्ज्ञांच्या मते, आयुर्वेदात द्राक्ष हे सर्वोत्तम फळ मानले जाते.

  • तज्ञ म्हणतात की तुम्ही गोड द्राक्षे खावीत कारण ते वात आणि पित्त दोष संतुलित करतात.

  • मायग्रेनची समस्या असलेल्या लोकांनी द्राक्षे खाल्ल्यास फायदा होतो. मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्षाचा रस खूप फायदेशीर मानला जातो.

  • हे डोळ्यांसाठी देखील खूप चांगले आहेत आणि शरीराचे पोषण करतात.

  • द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 1, कॅल्शियम आढळते.

  • द्राक्षांमध्ये अँटीफ्रोडायझियाक गुणधर्म देखील आढळतात. हे लैंगिक आरोग्यासाठी देखील चांगले आहेत.

  • द्राक्षांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. हिवाळ्यात अनेकदा पाण्याची कमतरता असते, त्यामुळे ते शरीराला आतून हायड्रेशन देतात.

  • सुक्या द्राक्षांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो. ते स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

  • सुकी द्राक्षे म्हणजेच मनुका देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. द्राक्षे खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होते आणि शरीरातील लोहाची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भरुन निघते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT