Health Care sakal
लाइफस्टाइल

Health Care News: हे 3 संकेत सांगतात तुमचा मधुमेह पोहोचलाय घातक पातळीवर! तज्ज्ञांनी दिली माहिती

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते, याचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीला मधुमेह झाला आहे.

Aishwarya Musale

आजकाल मधुमेहाची समस्या खूप वाढली आहे. लहान वयातच लोक त्याला बळी पडू लागले आहेत. मधुमेह सुरू झाला की त्याची अनेक लक्षणे आपल्या शरीरात दिसू लागतात.मधुमेहात शरीरातील इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी होते, त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. भूक आणि तहानपासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत, साखरेची पातळी वाढण्याची सुरुवातीची लक्षणे ओळखणे फार महत्वाचे आहे.

डोळ्यांमधील हे बदल दर्शवतात मधुमेहाची लक्षणं

ब्लड शुगर लेव्हल वाढल्यानंतर डोळ्यांच्या रेटिनाच्या रक्तवाहिन्या प्रभावित होतात. त्यामुळे डोळे कमकुवत होणे, धुसर दिसणे, मोतीबिंदू, ग्लूकोमा आणि सगळ्यात अधिक डायबिटिक रेटिनोपॅथीच्या समस्या वाढतात. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर तुमच्या डोळ्याचा प्रकाशही जाण्याची शक्यता आहे.

पायांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे विशेष लक्ष द्या

मधुमेह तुमच्या पायांना दोन प्रकारे प्रभावित करू शकते. पहिलं नर्व डॅमेज आणि दुसरं ब्लड सर्क्युलेशन असुरळीत होणे. अशा स्थितीत जखम सुद्धा लवकर बरी होत नाही.

मधुमेहाचा किडनीवरही होतो प्रभाव

हाय ब्लड शुगर तुम्हाला गंभीररित्या आजारी पडण्यास कारणीभूत ठरू शकते. व्यक्तीस वारंवार लघवी येणे, पाय, टाच आणि हात आणि डोळ्यांना सुजण येणे, उलट्या होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

हृदय आणि ब्लड वेसल्सवरही पडतो प्रभाव

मधुमेहाच्या रूग्णांना हृदयविकाराचा धोका असतो. स्ट्रोकचा देखील धोका वाढतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशननुसार, मधुमेहाच्या रूग्णांना अनेक आजारांचा धोका असतो.

मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. नाहीतर तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT