लाइफस्टाइल

Health Care News : तुम्हीही पीसीओएसच्या समस्येने त्रस्त आहात? मग चुकूनही आहारात 'या' गोष्टींचा समावेश करू नका

Aishwarya Musale

हल्ली ‘पीसीओस’ हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. त्यांना किती वेदना आणि त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करणे कठीण आहे.

ही समस्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे म्हणजेच शरीरातील रसायनांमुळे उद्भवते. PCOS मध्ये, महिलांच्या अंडाशयात लहान फोड किंवा गाठी तयार होतात. यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. या गाठ्यांमुळे अंडाशय नीट कार्य करू शकत नाहीत. PCOD आणि PCOS च्या उपचारांसाठी आहार खूप महत्त्वाचा आहे.

अनियमित मासिक पाळी येणे, मासिक पाळीच्या समस्या, वेदना, चेहऱ्यावर जास्त केस येणे, अ‍ॅक्ने, ब्रेकआउट, ओटीपोटाच्या समस्या आणि इनफर्टिलिटी अशा कारणांमुळे ही समस्या अधिक त्रासदायक होत आहे. PCOS आणि PCOD च्या समस्येसाठी आपण कोणत्या प्रकारचा आहार फॉलो केला पाहिजे हे जाणून घेऊया.

या गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहावे-

जर एखाद्या महिलेला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तिने नेहमी या गोष्टींपासून दूर राहावे-

रिफाइंड कार्ब्स

केक, पेस्ट्री, व्हाईट ब्रेड, पास्ता इत्यादी भरपूर मैदा वापरणाऱ्या खाद्यपदार्थांपासून दूर राहा. यामुळे PCOD आणि PCOS मध्ये आणखी समस्या निर्माण होऊ शकतात.

फास्ट फूड

फास्ट फूड, मैदा, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राय इत्यादींपासून नेहमी दूर राहा आणि PCOD आणि PCOS च्या समस्येच्या वेळी ते अजिबात खाऊ नका. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.

कार्बोनेटेड ड्रिंक्स

जास्त साखर असलेल्या आणि कार्बोनेटेड अशा एनर्जी ड्रिंक्सपासून दूर राहिले पाहिजे. यामध्ये कोल्ड्रिंक्स, सोडा, बिअर इ. त्यांच्यातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते खूप हानिकारक ठरू शकतात.

प्रोसेस्ड मीट

जर आपण पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्येबद्दल बोललो तर प्रोसेस्ड मीट खाणे टाळा. यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढू शकतो. या मांसाचे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. सलामी, सॉसेज, हॉट डॉग्स, हॅम, बेकन इत्यादी सर्व काही टाळावे.

रेड मीट

लाल मांस असलेल्या पदार्थांपासून दूर राहावे. यामुळे हायपरटेन्शनची समस्या वाढू शकते आणि ते तुमच्या कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरसाठीही चांगले नाही.

बेरी, हिरव्या पालेभाज्या, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल इत्यादी दाहक-विरोधी पदार्थांचा आहारात समावेश करावा. आपण आपल्या आहारात डार्क फ्रूट्स आणि हेल्दी फॅट्स समाविष्ट करू शकता. ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, नारळ, नट्स इत्यादी सर्व काही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT