लाइफस्टाइल

Health Care News: व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? वाचा एक्स्पर्ट काय सांगतात…

जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांनी आहाराची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

Aishwarya Musale

निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम, आहार आणि झोप या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. या तीन घटकांमुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत राहते, शिवाय अनेक आजारांपासून दूर राहता येते. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांनी आहाराची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. 

काही लोक काहीही न खाता व्यायाम करू लागतात. तर काही लोक व्यायाम करण्यापूर्वी पोट भरून खातात. तर काही लोक असे आहेत जे व्यायामानंतर खूप खातात. मात्र काहीही खाल्ल्यानंतर किती वेळाने व्यायाम करावा, याबाबत तुम्हाला माहिती आहे काय? चला तर आज आपण आहार आणि व्यायामामध्ये योग्य अंतर कसे ठेवावे हे जाणून घेऊया.

खाल्ल्यानंतर किती वेळाने व्यायाम करावा?

मेयो क्लिनिकच्या मते, जेवण आणि व्यायाम यामध्ये किमान ३ ते ४ तासांचे अंतर असावे. तसेच मिल आणि व्यायामामध्ये किमान 1 ते 3 तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही व्यायामापूर्वी जास्त खाल्ले तर तुम्हाला व्यायाम करताना आळस येईल.

पण याचा अर्थ असा नाही की रिकाम्या पोटी व्यायाम करावा. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. त्यामुळे जेवण आणि व्यायाम यामध्ये योग्य अंतर ठेवा.

सकाळी व्यायाम करण्याआधी काय खावे?

जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या किमान 1 तास आधी नाश्ता केलेला असावा. सकाळी उठल्यानंतर 1 तासानंतर काहीतरी खावे. त्यामुळे तुम्हाला व्यायामासाठी ऊर्जा मिळेल. जर तुम्ही सकाळी व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर न्याहारीमध्ये प्रोटीन आणि कार्ब्सचा समावेश करा.

होल ग्रेन, फॅटलेस दूध, ज्यूस, केळी आणि दही नाश्त्यात तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर काही हरकत नाही. तुम्ही चहा किंवा एक कप कॉफी पिऊ शकता.

व्यायामानंतर स्नॅक्स खावे की पूर्वी?

व्यायाम आणि जेवण यात जास्त अंतर असेल तर स्नॅक्स हा उत्तम पर्याय आहे. काही लोक व्यायामापूर्वी स्नॅक्स खातात. तर काही लोकांना व्यायामानंतर स्नॅक्स खाणे आवडते. स्नॅक्स कधी खावे हा प्रश्न नसून, तुमच्या शरीराला स्नॅक्सची गरज आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्यापेक्षा हेल्दी स्नॅक्स खाणे चांगले. जर तुम्हाला व्यायामानंतर उर्जा कमी वाटत असेल तर तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता. व्यायामापूर्वी किंवा नंतर आरोग्यदायी पदार्थ खाऊ शकतात. जसे की एनर्जी बार, केळी, सफरचंद किंवा ताजे फळ, दही, फ्रूट स्मूदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT