dates  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: थंडीच्या दिवसात सुपरफूड आहे खजूर; हिमोग्लोबिन वाढेल आणि पचनही सुधारेल

थंडीच्या मोसमात विशेष आहार घ्यावा आणि त्यात खजुराचा अवश्य समावेश असावा, असे आहार तज्ज्ञ सांगतात.

Aishwarya Musale

हिवाळ्यात ड्राय फ्रुटचे सेवन करणे गरजेचे आहे. ड्राय फ्रुटपासून बनवलेला हलवा लोक अनेक प्रकारे खातात. मात्र, ड्राय फ्रुट आरोग्यासाठी अनेक फायदेही देतो. थंडीमध्ये हे खाल्ल्याने शरीरात उष्णता राहते. ड्राय फ्रुटमध्ये खजूर प्रथम येतात. पण हिवाळ्यात खजूर खाण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते सांगणार आहोत. हिवाळा सुरू होताच बाजारात खजूर येतात. खजूर हे पोषक तत्वांचे भांडार आहे. त्यामुळे अनेक समस्यांपासून बचाव होतो. चला जाणून घेऊया त्याचे फायदे...

पचनक्रिया सुरळीत होते

पोट निरोगी ठेवण्यासाठी खजुराचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. कारण खजुरात भरपूर प्रमाणात फायबर असते. खजूर खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात आणि पोट निरोगी राहण्यास देखील मदत मिळते. पोटातील गॅस, अपचन, यासह इतर अनेक समस्या दूर करण्यासाठी खजूर खूप फायदेशीर आहे.

मधुमेह नियंत्रणात

काही लोकांना हिवाळ्यात मिठाईची तीव्र इच्छा असते. अशा परिस्थितीत साखरेचे रुग्ण हवे तसे गोड खाऊ शकत नाहीत कारण साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. पण खजूर हे असे ड्रायफ्रूट आहे की रोज खाल्ल्यास मधुमेहाच्या रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खजूर खूप फायदेशीर आहे. त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे.

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

हिवाळ्यात खजूर खाल्ल्यास किंवा दुधासोबत खाल्ल्यास सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते. या ऋतूमध्ये बहुतांश लोक सर्दी-खोकल्याला बळी पडतात. ही सर्व लक्षणे दूर करण्यासाठी खजूर प्रभावी आहेत. कारण त्यात अनेक पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT