World Stroke Day sakal
लाइफस्टाइल

World Stroke Day 2023: एकच नव्हे, तर तीन प्रकारचे असतात स्ट्रोक! वेळीच सावध होणं गरजेचं, जाणून घ्या लक्षणं

स्ट्रोकची संख्या दरवर्षी वाढत आहे. ही फार चिंतेची बाब आहे.

Aishwarya Musale

आजकाल, लोक त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडत आहेत. देशभरातील आणि जगभरातील अनेक लोक या समस्यांना सतत बळी पडत आहेत. स्ट्रोक ही या गंभीर समस्यांपैकी एक आहे, जी जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. ही एक मेडिकल इमरजेंसी आहे, जेव्हा तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा थांबतो तेव्हा उद्भवते.

स्ट्रोकचे एकापेक्षा जास्त प्रकार आहेत. स्ट्रोकचे मुख्य प्रकार, त्यांची लक्षणे आणि उपचार याबद्दल सर्व काही जाणून घेऊया-

स्ट्रोकचे किती प्रकार आहेत?

मेयो क्लिनिकच्या मते, स्ट्रोकचे तीन मुख्य प्रकार आहेत, ज्यामध्ये ट्रांसिएंट इस्केमिक स्ट्रोक, इस्केमिक स्ट्रोक आणि हेमोरेजिक स्ट्रोक यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया या तिघांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी-

इस्केमिक स्ट्रोक

हा स्ट्रोकचा सर्वात सामान्य प्रकार आहे. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्त प्रवाह गंभीरपणे कमी होतो. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी किंवा रक्ताच्या गुठळ्या जमा होऊ लागतात, त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह लक्षणीयरीत्या कमी होतो. काही सुरुवातीच्या अभ्यासातून असे सूचित होते की कोविड-19 संसर्गामुळे इस्केमिक स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

ट्रांसिएंट इस्कीमिक स्ट्रोक

ट्रांसिएंट इस्केमिक अटॅक (TIA) याला वॉर्निंग किंवा मिनिस्ट्रोक देखील म्हणतात. तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट टीआयएला कारणीभूत ठरते. रक्ताची गुठळी आणि TIA लक्षणे थोड्या काळासाठीच टिकतात.

हेमरेजिक स्ट्रोक


मेंदूतील ब्लड वेसल लीक होते किंवा फुटते तेव्हा हेमोरेजिक स्ट्रोक होतो. मेंदूतील रक्तस्त्राव रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या अनेक परिस्थितींमुळे होऊ शकतो. हेमोरेजिक स्ट्रोकशी संबंधित घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • अनियंत्रित उच्च रक्तदाब

  • रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अतिवापर

  • ट्रॉमा 

  • इस्केमिक स्ट्रोकमुळे रक्तस्त्राव देखील होतो

स्ट्रोकची प्रमुख कारणे

उच्च रक्तदाब- उच्च रक्तदाब हे ब्रेन स्ट्रोकचे मुख्य कारण आहे.

अॅट्रियल फायब्रिलेशन - अनियमित हृदयाचा ठोका रक्ताच्या गुठळ्या आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो.

धूम्रपान आणि अल्कोहोल- खराब जीवनशैली आणि अल्कोहोल-धूम्रपानाच्या सवयी देखील स्ट्रोकच्या धोक्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

मधुमेह- उच्च रक्तातील साखरेची पातळी रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT