लाइफस्टाइल

Health Care News : हार्ट ब्लॉकेजचा धोका होईल कमी, हे आसन करेल मदत

हार्ट ब्लॉकेजचा धोका होईल कमी, हे आसन करेल मदत

Aishwarya Musale

खराब जीवनशैली आणि खराब आहारामुळे हार्ट ब्लॉकेजची समस्या खूप वाढली आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या दिसून येत आहेत. ब्लॉकेजचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले कोलेस्टेरॉल हे रक्तवाहिन्या अरुंद करते. तुम्हालाही हार्ट ब्लॉकेजची समस्या टाळायची असेल, तर तुम्ही या योगासनांचा तुमच्या दिनक्रमात समावेश करू शकता.

भुजंगासन

भुजंगासन केल्याने हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो. यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात. आणि ब्लॉकेजचा धोकाही खूप कमी होतो.

भुजंगासन कसे करावे

भुजंगासन करताना पोटावर झोपावं. दोन्ही पाय जवळ जवळ ठेवावेत.

दोन्ही हात छातीच्या बाजूने जमिनीवर टेकवून ठेवावेत.

हनुवटी जमिनीला टेकलेली असावी. लांब श्वास घेत दोन्ही हातांवर भार देत वर उठावं.

नजर वर छताकडे ठेवावी.

आसन सोडताना श्वास सोडत हळूहळू पोटाचा, छातीचा भाग जमिनीला टेकवावा आणि सगळ्यात शेवटी कपाळ जमिनीला टेकवावे.

धनुरासन

धनुरासन केल्याने हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, हे आसन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

धनुरासन कसे करावे

हे आसन करण्यासाठी पोटावर झोपावे. हात बाजूला ठेवून पाय सरळ ठेवावेत.

नंतर गुडघ्यातून वाकून, आपले पाय नितंबांच्या जवळ आणा.

मग हळुवारपणे आपले घोटे हातांनी धरा.

लक्षात ठेवा की, हे आसन करताना तुमचे नितंब आणि गुडघे एकाच जागी असावेत.

तुम्ही तुमचे पाय तुमच्या धडाच्या जवळ आणता, तेव्हा तुमच्या मांड्या जमिनीपासून किंचित वर करा.

लक्षात ठेवा की, तुमचे डोके आणि छाती दोन्ही अवयव एकाच वेळी उंचावले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT