लाइफस्टाइल

Health Care News : अ‍ॅनिमिया रुग्णांसाठी फायदेशीर आहेत ही योगासनं, रक्ताची कमतरता होईल दूर

अ‍ॅनिमिया रुग्णांसाठी फायदेशीर आहेत हे योगासन, जाणून घ्या

Aishwarya Musale

शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यापैकी एक म्हणजे अॅनिमिया. हा एक अतिशय सामान्य आजार आहे, ज्यामध्ये शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असते आणि हिमोग्लोबिन कमी होते. त्यामुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, ताप येणे आदी लक्षणे दिसतात. हे बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते. जर तुम्हालाही अॅनिमियाचा त्रास होत असेल आणि तुम्हाला रक्त वाढवायचे असेल तर तुम्ही या योगाच्या मदतीने ही समस्या दूर करू शकता.

अॅनिमियाच्या रुग्णांनी हे आसन रोज करावे

अनुलोम-विलोम

अॅनिमियाच्या रुग्णांना अनुलोम विलोम केल्याने फायदा होऊ शकतो. हा प्राणायाम केल्याने लाल रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते आणि रक्ताची कमतरता दूर होऊ शकते. शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

अनुलोम विलोम कसे करावे

  • अनुलोम विलोमचा सराव करण्यासाठी, सुरुवातीला तुम्ही ध्यानाच्या स्थितीत बसा.

  • या स्थितीमध्ये तुमचे डोळे बंद असणे आवश्यक आहे. कंबर आणि पाठीचा कणा सरळ ठेवा आणि तुमचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा.

  • शरीर रिलॅक्स ठेवा आणि मोठा श्वास घेत रहा.

  • आता तुमच्या डाव्या हाताची बोटे ज्ञान मुद्रेमध्ये आणा आणि उजव्या हाताच्या बोटांनी नासिकाग्र मुद्रा करा.

  • आता उजव्या हाताच्या अनामिकेने (हाताच्या करंगळी शेजारचे बोट) डाव्या नाकपुडीला बंद करा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा.

  • हे आसन आता पाच वेळा करा आणि नंतर पुन्हा सामान्य पद्मासनात म्हणजेच तुमच्या आधीच्या स्थितीमध्ये या.

सूर्यभेद प्राणायाम

सूर्यभेद प्राणायाम केल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यासोबत रक्ताशी संबंधित विकारही झपाट्याने कमी होतात. शरीरात लाल रंगाच्या पेशी तयार होण्यास सूर्यभेद प्राणायाम मदत करतो आणि कफ, दमा, खोकला, सायनस, हृदय, मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्ये आराम देतो.

कपालभाती प्राणायाम

कपालभातीमुळे रक्ताशी संबंधित समस्याही झपाट्याने दूर होऊन अॅनिमियाच्या रुग्णांना फायदा होतो. याशिवाय कपालभाती प्राणायाममुळे पोटावरील चरबी झपाट्याने कमी होऊन लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT