साथीचे आजार वाढले. Sakal
लाइफस्टाइल

Health-Fitness-Wellness : सततच्या पावसामुळे वाढले आजार

डेंगू, मलेरियाचा धोका; बचावात्मक उपाययोजना करण्याचे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Health-Fitness-Wellness - तीव्र उन्हासाठी ओळखल्या जाणाऱ्या वैशाख महिन्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मागील काही दिवसांत दररोज वादळी पाऊस येत असल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे घरोघरी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण असून, नागरिकांमध्ये डेंगू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.

यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नागरिकांना करण्यात आले.सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा यांच्या वतीने वेळोवेळी नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने गृहभेटीच्या माध्यमातून संदेश किंवा सोशल मीडिया वा इतर माध्यमांच्या वतीने दिले जातात. रोजच पाऊस येत असल्याने कुलरचा वापर कमी झाला.

त्यामुळे कुलरच्या पाण्यात अळ्या झाल्या आहेत. कुलर तसेच इतरही टाकावू वस्तूंमध्ये पाणी साचल्याचे डासांचे प्रमाण वाढले आहे. साचलेल्या पाण्यात अळ्या तयार होऊन त्याचे रूपांतर डासांमध्ये होते.

या डासांमुळे प्रसारित होणारा प्लाज्मोडियम नामक परजीवी जंतूमुळे येणारा ताप म्हणजे हिवताप. सध्या घरोघरी ताप, सर्दीचे रुग्ण असल्याने तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

डेंगू बळावण्याची शक्यता

साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र उन्हामुळे डासांचे प्रमाण कमी होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डास तसेच इतर कीटकांचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला उन्ह तापल्याने घरोघरी कुलर लावण्यात आले. परंतु आता त्यांचा वापर होत नसल्याने कुलरमध्ये अळ्या झाल्या आहेत.

त्यामुळे डेंगूच्या प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डेंगू, मलेरियापासून बचावात्मक उपाययोजना कशाप्रकारे कराव्या, या आजाराची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथील आरोग्य सेवक लीलाधर पारिसे यांनी दिली.सततच्या पावसामुळे वाढले आजार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी; अतिरिक्त मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे, भूसंपादन प्रक्रियेत घोटाळे?

Breaking News Live Update: नाशिकमधील अत्याचार प्रकरणानंतर नामांकित आयटी कंपनीचे युनिट बंद होणार

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुन्हा नोंदविण्याबाबत राष्ट्रवादीचेही मौन!

IPL 2026: पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे मुंबईसमोर आव्हान; वानखेडेवर आज रॉयल चॅलेजर्स बंगळूरशी सामना, कशी असेल प्लेइंग-११

फिनालेपूर्वी 'हा' सदस्य घराबाहेर! बिग बॉसच्या पर्वातलं धक्कादायक Eviction, कोण आहे ती व्यक्ती?

SCROLL FOR NEXT