Homemade beauty tips  
लाइफस्टाइल

सौंदर्याचं नव्हे, तर नखांचंही आरोग्य जपा; फॉलो करा Homemade tips

शर्वरी जोशी

सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यामुळे अनेक स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी ब्युटीपार्लर, महागडे सौंदर्यप्रसाधने यांचा वापर करत असतात. परंतु, सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांची आवश्यकता नाही. कारण सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा जर आपण आहारातूनच शरीराला योग्य ते घटक पुरवले तर त्याचा परिणाम आपोआप आपल्या चेहऱ्यावर दिसून लागतो. त्यामुळे आपल्या आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा आवर्जुन समावेश करायला हवा. चेहऱ्यासोबत आपलं शारीरिक आरोग्यदेखील तितकंच जपलं पाहिजे. मात्र, यात अनेकदा आपल्या नखांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी, नखांची स्वच्छता न केल्यास त्यात मळ जमा होतो आणि जेवतांना तो नकळतपणे आपल्या पोटात जातो. ज्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्धभवू शकतात. त्यामुळेच नखांचं सौंदर्य आणि आरोग्य कसं जपावं ते पाहुयात.

अशी घ्या नखांची काळजी

१. नखं स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून त्यात थोडा वेळ हात टाकून ठेवा.

२. नख नियमित स्वच्छ करा.

३. नखं कधीही फार वाढवू नका.

४. नखं कापण्यासाठी कधीही मेटल इन्स्ट्रूमेंटचा वापर करु नका.

५. सतत नेलपेंटचा वापर करु नका.

६. नेलपेंटप्रमाणेच सतत नेल रिमूव्हरदेखील वापरु नका.

७. हातांप्रमाणेच नखांनादेखील क्रीम किंवा मॉइश्चराइजर लावा.

८. नखं दातांनी तोडू नका.

९. नखांच्या मजबुतीसाठी संतुलित आहार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT