Health tips  esakal
लाइफस्टाइल

Health Tips : मधुमेहावर करायचीय मात तर हे पदार्थ असायलाच हवेत आहारात, लवकर फरक जाणवेल!

मधुमेह असणाऱ्या लोकांनी कडक डायट पाळावे लागते

सकाळ डिजिटल टीम

Health Tips :

सध्या घरटी एक दोन तरी मधुमेहाचे रूग्ण आहेत. ज्यांचं वय जास्त आहे त्यांना तर आहेच पण कोवळ्या वयातल्या मुला-मुलींनाही मधुमेहाचा आजार होत आहे. काही गर्भवती मातांनाही प्रेग्नंसी किंवा डिलिव्हरीनंतर मधुमेहाची लागण होते.

मधुमेह असणाऱ्या लोकांनी कडक डायट पाळावे लागते. त्यांना अनेक गोष्टी खाणं बंद करावं लागंत. अगदी मनात नसताना साखरेपासून दूर रहावं लागतं. डॉक्टरांच्या मते, हा आजार औधषांपेक्षा रूग्णांनी घेतलेल्या काळजीने अधिक बरा होतो.

काहीवेळा मधुमेह ग्रस्त रुग्णांना रक्तातील साखर वाढणे, कमी होणे असे प्रकार होतात. साखरेची पातळी कमी जास्त झाली तर रूग्णांना चक्करही येते. त्यामुळे, त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

तुम्ही स्वत: मधुमेहाने ग्रस असाल. तर आज आम्ही तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. ती म्हणजे तुम्ही रोजचे जेवण वेळेवर घेऊन जर तुम्ही काही रस आणि ज्यूस प्यायलात. तर, मधुमेहावर मात करता येऊ शकते. अशा कोणत्या गोष्टी आहेत हे पाहुयात.

आवळा

आवळ्यामध्ये भरपूर क्रोमियम असते. हे एक खनिज आहे जे कार्बोहायड्रेट पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करते. असे म्हटले जाते की ते शरीराला इन्सुलिनला अधिक प्रतिसाद देते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आवळ्याच्या सेवनाने तुमची पचनसंस्थाही सुरळीत राहते.      


कडुनिंब

कडुनिंब रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते.  कडुनिंब त्यामुळे मधुमेहावर रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. किंवी त्याचा रस पिऊ शकता.

जांभूळ

हे एक आंबट-गोड चवीच फळ आहे. जांभूळमध्ये जांबोलिन नावाचे संयुग असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हा रानमेवा कुठेही सहज उपलब्ध असतो.

दालचिनी

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ती खूप फायदेशीर मानली जाते. इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जो रक्तातील साखर काढून टाकण्याचे काम करतो. तुम्ही दालचिनी चहा किंवा पाणी पिऊ शकता.

कारले

कारले शरीरातील रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण कारल्यामध्ये इन्सुलिनसारखे काम करणारे गुणधर्म असतात, जे ऊर्जेसाठी पेशींमध्ये ग्लुकोज आणण्यास मदत करतात. तुम्ही कारल्याचा रस सकाळी पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT