मेडिटेरियन डाएट Esakal
लाइफस्टाइल

कोलेस्ट्रॉलच्या समस्येसाठी Best Diet, या डाएटमुळे Bad Cholesterol होईल दूर

इटली, तुर्की, लेबनान, ग्रीस, क्रोएशिया अशा २१ देशांमध्ये हे डाएट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. आता हे मेडिटेरियन डाएट म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडेल. तेव्हा जाणून घेऊयात मेडिटेरियन डाएट आणि त्याचे फायदे

Kirti Wadkar

निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम Exercise यांचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र अलिकडे बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे Lifestyle लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. Health Tips Marathi know about Mediterranean diet control cholesterol

चुकीच्या आहार पद्धती, व्यायामाचा Exercises अभाव तसंच ताण या गोष्टींमुळे कमी वयातच अनेक गंभीर आजारांचा सामान करावा लागतोय. खास करून मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या Cholesterol समस्या वाढताना दिसत आहेत.

काहीजण फिट राहण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अलिकडे डाएटचे Diet वेगवेगळे प्रकार ट्राय करताना दिसतात. हावर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हेजिटेरीयन म्हणजेच शाकाहारी आहार Vegetarian Food घेणं चांगलं मानलं जातं.

मात्र अनेकांना आहारात मांसाहार घेण्याची सवय असते. अशावेळी अचानक शाकाहारी आहार घेणं कठिण होते.

काही अंशी मांसाहार करता येणं शक्य आहे. यासाठी मेडिटेरियन डायट हा एक पर्याय हावर्ड मेडिकल स्कूलने सांगितला आहे. इटली, तुर्की, लेबनान, ग्रीस, क्रोएशिया अशा २१ देशांमध्ये हे डाएट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. आता हे मेडिटेरियन डाएट म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडेल. तेव्हा जाणून घेऊयात मेडिटेरियन डाएट आणि त्याचे फायदे.

हे देखिल वाचा-

काय आहे मेडेटेरेनियन डाएट

Mediterranean Diet हे एका प्रकारचं प्लांट बेस्ड डाएट आहे. यामध्ये ताजी फळं, भाज्या, नट्स, ऑलिव्ह ऑइल आणि पारंपरिक मसाले आणि बीन्सचा समावेश असतो.

या डाएटमध्ये प्रोटीनसाठी लो फॅट पनीर, दही आणि संतुलित प्रमाणात अंड्यांचं सेवन करता येतं.

या डाएटमध्ये कोणतही इतर तेल न वापरता स्वयंपाकासाठी किंवा पदार्थ बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करण्यात येतो.

या डाएटमध्ये आठवड्यातून दोनदा सीफूड किंवा माशांचं सेवन करायचं असतं. त्यामुळे मांसाहारी लोकांसाठी हे डाएट एक चांगला पर्याय ठरतो.

प्रोसेस्ड फूड म्हणजेच प्रक्रिया केलेल्या पदार्थांचं सेवन करू नये किंवा अगदी कमी प्रमाणात करावं.

मेडिटेरेनियन डाएटचे फायदे

अभ्यासानुसार मेडिटेरेनियन डाएटचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं समोर आलंय. हे डाएट फॉलो केल्याने मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर, हार्ट अटॅक आणि स्मरणशक्ती कमी होणं Memory Loss या समस्या दूर होऊ शकतात.

तसंच जे लोक मेडिटेरियन डाएट फाॅलो करतात त्यांचं वजन इतर लोकांच्या तुलनेत कमी राहतं. त्यामुळेच वजन कमी करून ते नियंत्रणात राखण्यासाठी या डाएटची मदत होवू शकते.

वेटलॉससोबतच मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी देखील मेडिटेरियन डाएटचा फायदा होते. अभ्यासानुसार हे डाएट फॉलो करणाऱ्यांमध्ये इतरांच्या तुलनेत नैराश्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं आहे.

मेडिटेरियन डाएट करणाऱ्यांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या तसंच डिमेन्शियाची समस्या कमी आढळून येते.

एकंदरच आहारामध्ये जास्तीत जास्त कॅलरी या प्लांट बेस्ट डाएटमधून घेऊन काही प्रमाणात मांसाहार शक्य असलेल्या या डाएटमुळे कोलेस्ट्रॉलची समस्या तर दूर होतेच. शिवाय आरोग्याच्या इतर गंभीर समस्या देखील दूर होवू शकतात. या डाएटमुळे जीवनमान वाढत असल्याचं रिसर्चमधून सिद्ध झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: आम्ही कबुतरांना खाणं देण्यास तयार आहोत, बीएमसीचा निर्णय; पण न्यायालयाची नाराजी, कडक शब्दात सुनावलं, म्हणाले...

Thane Traffic: कल्याण शीळ रोडवर प्रचंड कोंडी, नागरिकांचे हाल; शरद पवार गट आक्रमक

ओले केस, मनमोहक अदा आणि गुलाबी साडी! पावसात अंजली अरोराचा हॉट डान्स, व्हिडिओ व्हायरल

Georai News : वाढदिवसाचा तलवारीने केक कापणे युवकाच्या आले अंगलट; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले ताब्यात

Best Time To Wake Up: शास्त्रानुसार उत्तम आरोग्यासाठी सकाळी किती वाजता उठले पाहिजे? तज्ञ सांगतात...

SCROLL FOR NEXT