Diet Tips sakal
लाइफस्टाइल

Rainy Season Diet Tips: पावसाळ्यात एका तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेले अन्न कधीही खाऊ नका, नाहीतर...

पावसाळ्यात लोकांना निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

Aishwarya Musale

शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. खाण्या-पिण्याने आपल्याला ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. सध्या पावसाळा सुरू असून या ऋतूत आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यात लोकांना निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात हवेत आर्द्रता असते आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.

आरोग्य तज्ज्ञ पावसाळ्यात नेहमी ताजे अन्न खाण्याचा सल्ला देतात. जास्त काळ ठेवलेले अन्न या ऋतूत खाऊ नये. आता प्रश्न पडतो की पावसाळ्यात किती वेळ ठेवलेले अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया आहारतज्ज्ञांकडून याचे उत्तर.

नोएडाच्या डाएट मंत्राच्या संस्थापक डाएटिशियन कामिनी सिन्हा यांच्या मते, शिळे अन्न कोणत्याही ऋतूत खाऊ नये. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात खाण्यापिण्यात जास्त काळजी घ्यावी लागते. या हंगामात 3 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न टाळावे. फक्त ताजे तयार केलेले अन्न खावे.

विशेषत: जे पदार्थ लवकर खराब होतात, ते लवकरात लवकर खावेत. अन्न जास्त वेळ ठेवल्याने ते दूषित होण्याचा धोका असतो, ज्यामुळे पोटात संसर्ग होऊ शकतो. अनेकांना अन्नातून विषबाधा होण्याचीही समस्या असू शकते. हे टाळण्यासाठी स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घ्या आणि ताजे अन्न खा.

तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात फळे आणि भाज्यांचे सेवनही जपून केले पाहिजे. या हंगामात कापलेली फळे खरेदी करू नयेत, कारण त्यामुळे आजार होऊ शकतात. जी फळे सोलून खाऊ शकतात ती फायदेशीर मानली जातात. पावसाळ्यात पॅक ज्यूसऐवजी ताजा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भाज्या स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालावे आणि नंतर भाज्या धुवाव्यात. यानंतरच तुम्ही भाज्या स्वयंपाकघरात ठेवा आणि वापरा.

आहारतज्ञ कामिनी सिन्हा सांगतात की, या ऋतूत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा स्थितीत आजारांचा धोकाही वाढतो. हे टाळण्यासाठी सर्व लोकांनी त्यांच्या आहारात आले, लसूण आणि लिंबू यांचा समावेश केला पाहिजे. लिंबूवर्गीय फळेही भरपूर प्रमाणात खावीत.

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी जंक फूड टाळावे. सकस आहार घ्यावा आणि स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे. या मोसमात पाणी स्वच्छ न राहिल्यास टायफॉइडसह अनेक आजारांचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT