Weight Loss Tips sakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips: तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर 'या' तीन पद्धतीने शिमला मिरची खाच

तुमचं वजन कमी करण्यासाठी दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करावा लागेल.

Aishwarya Musale

तुमचं वजन कमी करण्यासाठी दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करावा लागेल. पण जर तुम्ही तुमचा आहार योग्य ठेवलात तर हे काम तितकेसे अवघड नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण कॅप्सिकम तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते.

तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर आजपासूनच तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करा. तुमच्या आहारामध्ये शिमला मिरचीचा समावेश करण्यापूर्वी, तुम्हाला त्याचा आहारात समावेश कसा करायचा हे माहित असणे आवश्यक आहे.

भाजलेली शिमला मिरची खा: भाजलेली शिमला मिरची खाल्ल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. सिमला मिरचीमध्ये Capsaicinoids आढळतात, जे चयापचय सुधारण्यास आणि ब्लड सर्कुलेशन वाढविण्यास मदत करतात.

शिमला मिरचीचे सूप: तुम्ही सूपच्या स्वरूपातही शिमला मिरचीचे सेवन करू शकता. शिमला मिरचीचे सूप तयार करण्यासाठी, आपल्याला हिरव्या भाज्यांसह शिमला मिरची चांगली शिजवावी लागेल. नंतर त्यावर कोथिंबीर व लसूण टाका. आपण चवीनुसार काळे मीठ घालू शकता.

शिमला मिरचीचा प्रोटीन शेक: सिमला मिरचीचा प्रोटीन शेक देखील बनवता येतो. प्रोटीन शेक बनवण्यासाठी तुम्हाला ब्रोकोली, सिमला मिरची आणि प्रोटीन पावडर घ्यावी लागेल. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून मीठ आणि लिंबू घालून शेक बनवा.

तुम्ही या तीन प्रकारे सिमला मिरचीचे सेवन करून तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. तुमच्या दिनक्रमात शिमला मिरचीचा समावेश करण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या दिनचर्येत व्यायामाचाही समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT