Bad Mood sakal
लाइफस्टाइल

Bad Mood In Morning: झोपेतून उठल्यावर तुमचाही मूड खराब असतो का? ‘या’ टिप्स वापरून पहा

धावपळीच्या जीवनात आजकाल लोक खूप तणावात राहतात.

Aishwarya Musale

सकाळी उठल्यावर तुम्हाला चिडचिड, राग आणि गोंधळल्यासारखे वाटते का? जगातील सर्व समस्या तुमच्या डोक्यावर आहेत असे तुम्हालाही वाटते का? जर असं वाटत असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण जे लोक सकाळी खराब मूड घेऊन उठतात, अशा लोकांमध्ये दिवसभर संघर्ष करण्याची समस्या दिसून येते.

सकाळी मूड खराब असेल तर त्यांची विचारसरणीही नकारात्मक होते आणि त्यामुळे कामाच्या प्रोडक्टिविटीवरही परिणाम होतो.यामागे अनेक कारणे असू शकतात.मूड ऑफ होण्यामागची कारणे काय आहेत हे जाणून घेऊ.

सकाळी उठल्यावर मूड का खराब होतो?

डॉक्टरांचा असा विश्वास आहे की हे सहसा तेव्हा होते जेव्हा तुमची रात्रीची झोप पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला आरामदायी झोप मिळाली नाही. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा माणूस गोंधळून जातो, थकवा आणि आळस यांमुळे मन चिडचिड होते.

ही समस्या विशेषत: कॅफीन, चहा-कॉफी, सिगारेट, अल्कोहोल जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्यांना आढळते. याशिवाय हा त्रास अधिक होतो. अशा लोकांसोबत ज्यांना झोपण्याची निश्चित वेळ नाही.

याचा सामना कसा करायचा?

या समस्येला सामोरे जाण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे सर्वात आवश्यक आहे, योग्य वेळी झोपल्याने ही समस्या सुटू शकते.त्यासाठी झोपण्याची वेळ फिक्स करा. यामुळे काही दिवसात तुमच्या शरीराला याची सवय होईल आणि एक रुटीन तयार होईल.त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.याशिवाय संतुलित आहार घेणे, सकाळी लवकर उठून ध्यान करणे.

अल्कोहोल आणि धुम्रपानापासून दूर राहिल्याने तुम्हाला या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल. या समस्येचा सामना करू शकता. असे असूनही, तुमची या समस्येपासून सुटका झाली नाही, तर तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT