dr shri balaji tambe tips for helath and good food 
लाइफस्टाइल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असावं?

शर्वरी जोशी

कामाच्या गडबडीत किंवा धावपळीच्या नादात अनेकदा आपण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. सध्याच्या काळात अनेक जण लठ्ठपणा आणि वाढतं कोलेस्ट्रॉल (cholesterol) या समस्येने त्रस्त आहेत. म्हणूनच, शरीरातील कोलेस्ट्रॉलचं वाटतं प्रमाण थांबवायचं असेल तर आपल्या आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात. व या समस्या टाळण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ते जाणून घेऊयात. (health-to-reduce-bad-cholesterol-from-the-body-do-away-with-these-things-from-today-itself)

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या

१. वजन वाढणे

२. सतत पायाचे किंवा हाताचे तळवे दुखणे

३. छातीत दुखणे

४. थकवा जाणवणे

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असावं?

आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 200 MG/DL इतकं असणं गरजेचं आहे. त्यात चांगलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 60 MG पेक्षा जास्त नसावं. आणि, बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 100 MG पर्यंतच असावं.

या पद्धतीने कमी करा कोलेस्ट्रॉल

१. ग्रीन टी -

ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी होतं इतकंच आपल्याला माहित आहे. परंतु, ग्रीन टी प्यायल्यामुळे वजनासोबतच शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलदेखील कमी होतं. ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमामावर असतात. त्यामुळे वाढत्या वयाच्या खुणाही कमी होतात.

२. आळशी -

आळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं. सोबतच अनेक किरकोळ आजारदेखील दूर होतात.

३. कडधान्य -

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचं असेल तर आहारात कडधान्यांचा समावेश करा. यात खासकरुन मूग, हरभरा, काबुली चणे आवर्जुन खा. शक्यतो हे कडधान्य भिजवून मोड आणून खावेत.

४. लसूण -

लसणाचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉलसोबत वजनदेखील नियंत्रणात राहतं. त्यामुळे दररोज सकाळी कच्चा लसूण खावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT