Monsoon Diet Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Diet: पावसाळ्यात घ्या योग्य आहार, राहाल निरोगी अन् तंदुरूस्त

Monsoon Diet: पावसाळा सुरू होताच मंदावणारी पचनक्रिया लक्षात घेऊनच आहारात बदल करणे आवश्यक असते.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Diet: मॉन्सून दाखल झाल्यानंतर या कालावधीत शरीराला बदलत्या हवामानाशी पर्यायाने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. याच कालावधीत काही साथीचे आजार डोके वर काढतात. विशेषतः लहान मुले व वयस्कांना याचा सर्वाधिक धोका जाणवतो. यामुळे आहार नीट ठेवून स्वतःची प्रकृती व्यवस्थित राखणे शक्य आहे.

पावसाळा सुरू होताच मंदावणारी पचनक्रिया लक्षात घेऊनच आहारात बदल करणे आवश्यक असते. दूषित अन्न व पाण्यामुळे जुलाब, अतिसार, कॉलरा, कावीळ असे अनेक आजार होऊन गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता सर्वाधिक असते. यासाठी पावसाळ्यात योग्य आहाराचे नियोजन ठेवणे गरजेचे आहे.

असा ठेवा फलाहार

जास्त पिकलेली फळे खाऊ नयेत. पावसाळ्यात आंबा, फणस, केळी खाणे टाळावे; कारण यामुळे अपचन होऊन जुलाब, अतिसार होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

धान्ये, कडधान्यांवर भर

पावसाळ्यात धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला लाह्या खाल्ल्या जातात. पचनास हलकी असणारी मूग डाळ पावसाळ्यामध्ये आहारात घ्यावी. मूग डाळीचे वरण हे भातामध्ये तूप घालून खावे.

मांसाहार कमी करावा

पचनसंस्था मंदावल्यामुळे मांसाहारी पदार्थ खाणे कमी करायला हवे. मांसाहारी पदार्थ हे पचनास जड असल्यामुळे शरीर जड राहणे, आळस येणे थकवा जाणवण्यासारखे परिणाम दिसून येतात.

पाण्याबाबत दक्ष हवे

पावसाळ्यामध्ये पाणी दूषित झालेले असते. अशा वेळी पाणी गाळून, उकळवून, स्वच्छ करूनच पिणे चांगले. अस्वच्छ पाण्यामुळे या दिवसांत जुलाब, अतिसार, उलट्या, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाइड असे अनेक आजार होतात.

असा असावा आहार

पचनास हलका व ताजा, गरम आहार घ्यावा. आहारात लाह्या, मुगाचे वरण, तूप घालून वरणभात, फळभाज्या, भाज्यांचे सूप यांचा समावेश असावा. पावसाळ्यात भूक वाढविणारा व पचन होणाऱ्या अन्नाचा समावेश करावा. यासाठी मिरे, हिंग, सुंठ, आले, लसूण, जिरे अशा पचनास पोषक घटकांचा आहारात समावेश करावा.

पालेभाज्यांबाबत दक्षता आवश्‍यक

पावसाळ्यामध्ये पालेभाज्या टाळाव्यात अथवा कमी खाव्यात. या दिवसांत पालेभाज्यापेक्षा फळभाज्या अधिक खाल्ल्याने लाभ मिळतो. नीट स्वच्छ करूनच भाज्यांचा आहारात उपयोग करावा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा या फळभाज्यांचा आहारात समावेश अवश्य करावा. भाज्यांचे सूप घेतल्याने फायदा मिळतो.

हे खाणे टाळाच

पचायला जड असणारे पदार्थ

आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेणे

थंडगार पदार्थ, दही, लोणची, ब्रेड, खारट पदार्थ, फास्टफूड

तळलेले पदार्थ पचनास जड व पित्त वाढवणारे ते खाणे टाळावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT