Healthy Stomach:  Sakal
लाइफस्टाइल

Healthy Drink For Stomach: 'या' गोष्टी पोटासाठी आहेत पंचामृत, उन्हाळ्यात पचनसंस्था राहील निरोगी

Healthy Drink For Stomach: किचनमध्ये पचनसंस्था सुधारण्यासाठी अनेक मसाले आणि औषधी वनस्पती असतात. जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Puja Bonkile

healthy drinks for stomach panchamrit improve digestion summer

किचनमध्ये पचनसंस्था सुधारण्यासाठी अनेक मसाले आणि औषधी वनस्पती असतात. जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात जिरं बडीशेप, धणे, मेथी आणि ओवा अशा पाच गोष्टींचा समावेश आहे. पोटासाठी आणि पचनासाठी त्याला पंचामृत म्हणतात.याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. या गोष्टी वजन कमी करण्यास मदत करतात आणि अनेक आजार दूर ठेवतात.

या पाण्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. हे पंचामृत मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते.

धणे, मेथी, जिरं, ओवा आणि बडीशेप यांचे पंचामृत कसे बनवावे?

यासाठी तुम्हाला 1 चमचे जिरं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा ओवा, 1 चमचे मेथी दाणे आणि 1 चमचे धणे लागेल. सर्व साहित्य मिक्स करा आणि माती किंवा काचेच्या बनवलेल्या एका ग्लास पाण्यात टाका. रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे पाणी 11 दिवस सतत प्यावे.

  • पोटासाठी कोणत्या गोष्टी अमृतासारख्या आहेत?

वरील पदार्थांचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे, पचनसंस्था जलद होते आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते.

मेथी, बडीशेप आणि इतर मसाल्यांचे पाणी यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते.

या मसाल्यांमध्ये भरपूर फायबर असते आणि जर तुम्ही ते पाण्याने चघळले तर ते बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांपासून आराम देतात.

मेथी, बडीशेप, जिरे आणि ओव्याचे पाणी देखील शरीरात जमा झालेले खराब कॉलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

Hockey World Cup: दोनदा आघाडी, पण तरी अखेर चीनविरुद्ध भारताची बरोबरी! पहिल्याच सामन्यात रंगला थरार

Aadhaar Centres Only on Paper: मुळशीतील आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर; २० पैकी ७ केंद्रे मंजूर ठिकाणीच नाहीत, काहींचा ठाव ठिकाणा प्रशासनालाच नाही

Marathi News Live Updates : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला गेलेला तरुण काळ नदीत बेपत्ता

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT