Healthy Heart
Healthy Heart esakal
लाइफस्टाइल

Healthy Heart : हृदयाचे ठोके वाढण्याला रोमॅन्टिक समजू नका; भलतच आहे कारण, वेळीच काळजी घ्या!

Pooja Karande-Kadam

Healthy Heart :

आजच्या काळात हृदयविकार झपाट्याने वाढू लागले आहेत, त्यामुळे सावध राहण्याची विशेष गरज आहे. आजकाल मोठ कलाकारही अचानक होणाऱ्या हृदयविकाराला बळी पडत आहेत. तर, सामान्य माणसांमध्येही हा आजार बळावला आहे. बर्‍याचदा चित्रपटांमध्ये हृदयाचे ठोके वाढणे हे प्रेमाची भावना दर्शवते, परंतु वास्तविक जीवनात ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते.

ही प्रेमाची भावना नसून गंभीर समस्येचे लक्षण आहे. हा आजार अॅट्रियल फायब्रिलेशन आहे. हा हृदयाच्या ठोक्याशी संबंधित आजार आहे. जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

अॅट्रियल फायब्रिलेशन म्हणजे काय?

ॲट्रियल फिब्रिलेशन ही एक अनियमित आणि अनेकदा अतिशय जलद हृदयाची लय आहे (अरिदमिया) ज्यामुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. A-fib स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि हृदयाशी संबंधित इतर गुंतागुंत होण्याचा धोका वाढवते.

ॲट्रियल फिब्रिलेशनदरम्यान, हृदयाच्यावरच्या चेंबर्स (ॲट्रिया) अनियमितपणे आणि जलदरीत्या धडधडतात. ॲट्रियल फिब्रिलेशनचा त्रास हा सतत अथवा काही कालावधीमध्ये होऊन परत पूर्ववत होऊन कालांतराने परत होऊ शकतो.

शक्यता कोणाला जास्त?

वाढलेले वय, उच्च रक्तदाब, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड गंथीचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, धूम्रपान, अति मद्यपान या गोष्टींमुळे हा त्रास होण्याची शक्यता बळावते.

या हृदयरोगाची लक्षणे कोणती?

-जलद हृदयाचा ठोका

-थकवा

-चक्कर येणे

-श्वास घेण्यात अडचण

-हृदयाचे ठोके चुकणे

-छातीत दुखणे

-कोणतीही लक्षणे नसलेला आजार

ही कारणे असू शकतात?

  1. मधुमेह

  2. जास्त वजन

  3. वाढते वय

  4. दारू पिणे किंवा धूम्रपान करणे -

  5. फुफ्फुसाचा कोणताही आजार

  6. कोणताही हृदयविकार

  7. जास्त कॅफिन घेणे

  8. थायरॉईड

  9. स्लीप एपनिया

  • कसे टाळावे-

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवणे

  • आरोग्यदायी

  • आहार घ्या

  • मीठ, ट्रान्स फॅट आणि साखर मर्यादित ठेवा

  • फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये असलेले संतुलित आहार घ्या.

  • व्यायाम करा

  • ताण येऊ देऊ नका

  • भरपूर पाणी प्या

  • अल्कोहोल किंवा कॅफिन टाळा

  • 7-8 तास पुरेशी झोप घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT