Yoga For Diabetes sakal
लाइफस्टाइल

Yoga For Diabetes : 'या' पाच योगासनांनी शुगर होईल झटक्यात कंट्रोल

डायबिटीज पेशंटनी काही योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या आजुबाजूला मधुमेहाचे अनेक रुग्ण असतात आणि दिवसेंदिवस मधुमेहाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ दिसत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. या संदर्भात पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ डॉ अमित भोरकर यांनी याविषयी माहिती दिली.

मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणाऱ्या सोप्प्या योगासनांची यादी त्यांनी सांगितली. ही योगासने नियमितपणे केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना फार मदत होते.

१. कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायाम आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या मज्जातंतूंना ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे प्राणायाम महत्त्वाचे आहे कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. प्राणायामने मनाला शांती मिळते.

२. सुप्त मत्स्येन्द्रसन

सुप्त मत्सेंद्रयासन अन्न पचन करण्यास मदत करते. हे आसन मधुमेह रुग्णांसाठी खूप चांगले आहे.

३. धनुरासन

या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरते.

४. पश्चिमोत्नासन

हे आसन ओटीपोटातील अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पश्चिमोत्नासन योगा शरीरातील महत्वाची उर्जा वाढवते आणि मनाला शांती प्रदान करते.

५. शवासन

शवासन संपूर्ण शरीराला विश्रांती देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत नेते, ज्यामुळे मन शांत होते आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT