लाइफस्टाइल

माऊथवॉश वापरताय?; निर्माण होऊ शकतात 'या' गंभीर समस्या

माऊथवॉश वापरताना घ्या काळजी; निर्माण होतील 'या' शारीरिक समस्या

शर्वरी जोशी

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासा असा सल्ला कायमच डॉक्टर आणि तज्ज्ञ मंडळी देत असतात. मात्र, सकाळ आणि रात्र या दोन्ही वेळांमध्ये कमालीचं अंतर असतं. या फावल्यावेळात आपण अनेक पदार्थांचं सेवन करत असतो. त्यामुळे तोंडात जीवाणूंची संख्या वाढत असते. बऱ्याचदा खूप काळ तोंड बंद ठेवलं तरीदेखील जीवाणूंची संख्या वाढते आमि तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे या समस्येवर तोडगा म्हणून बाजारात अनेक माऊथवॉश उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकांना वाटतं की टूथपेस्ट आणि माऊथवॉश साधारणपणे एकाच प्रकारच्या रसायनांपासून तयार केली जातात. परंतु, या दोन्ही गोष्टी तयार करताना वेगवेगळी रसायने वापरली जातात. त्यामुळेच माऊथवॉशचा अतिरेक वापर करणं अनेकदा त्रासदायक ठरु शकतं. म्हणूनच, माऊथवॉशचा अतिरेक केल्यावर कोणत्या समस्या निर्माण होतात ते जाणून घेऊयात. (healthy-living-side-effects-of-using-mouthwash-ssj93)

१. तोंडात जळजळ होणे -

माऊथवॉशचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर तोंडात जळजळ होण्याची शक्यता असते. माऊथवॉशमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. सोबतच अँटीबॅक्टेरिअल गुणही असतात. ज्यामुळे तोंडातील आतल्या भागात जळजळ होऊ शकते. अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त जळजळ झाल्यास तोंडात फोडदेखील येऊ शकतात.

२. आरोग्यासाठी हानिकारक -

माऊथवॉशमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जास्त प्रमाणात ते वापरल्यास शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकदा माऊथवॉशने गुळण्या करताना ते घशात जातं त्यामुळेदेखील त्रास होऊ शकतो. तसंच साधारणपणे दिवसातून एकदाच माऊथवॉशचा वापर करावा. आणि, लहान मुलांना अजिबात वापरू देऊ नये.

३. तोंड कोरडं पडणे -

माऊथवॉशमुळे तोंड शुष्क म्हणजे कोरडं पडतं. त्यामुळे बऱ्याचदा कॅव्हिटीसोबतच श्वासामधून दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

४. ओरल हेल्थ प्रॉब्लेम -

अनेकदा माऊथवॉश वापरत असताना आपल्याला तोंडात निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव होत नाही. मात्र, अतिरेक झाल्यानंतर या समस्या डोकं वर काढतात. खासकरुन तोंड येणे, हिरड्या लालसर होणे, जिभेवर फोड येणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे माऊथवॉश दिवसातून एकदाच वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT