cholesterol Sakal
लाइफस्टाइल

Healthy Lifestyle: वयाच्या 30 व्या वर्षी कोलेस्टॉरॉल वाढल्यावर शरीरात दिसतात 'ही' 5 लक्षणे, वेळीच घ्या काळजी

Cholesterol Symptoms: शरीरात कोलेस्टॉलची पातळी जास्त असल्यास अनेक प्रकराची लक्षणे दिसतात. वयाच्या तीशीनंतर कोणते लक्षणे दिसतात किंवा कोणत्या समस्या जाणवतात हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Cholesterol Symptoms: सध्याची चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक आजार निर्माण होत आहे. अनेकांना लहान वयात कोलेस्टेरॉलची समस्यांना सामोरे जावे लागते. निरोगी व्यक्तीचे रक्त 200 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) पेक्षा कमी असावे. यापेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल असल्यास अनेक समस्या वाढू शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. वयाच्या 30 व्या वर्षी कोलेस्टॉल वाढल्यास अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. चला जाणून घेऊया शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर कोणती लक्षणे दिसतात?

छातीत दुखणे

शरीरातील कोलेस्टॉलची पातळी खूप वाढल्यास रुग्णांना छातीत दुखू शकते. शरीरात कोलेस्टॉलची पातळी वाढल्याने हार्ट ब्लॉकेज होऊ शकते. यामुळे छातीत दुखण्याची तक्रार होण्याची शक्यता असते.

श्वास घेण्यास अडचणी

हाय कोलेस्टेरॉलमुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. कारण यामुळे हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे रक्ताभिसरण देखील कमी होऊ शकते, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात.

त्वचेवर पिवले डाग

शरीरात कोलेस्टॉरॉलची पातळी वाढल्यास कधीकधी त्वचेवर पिवळ्या रंगाचे फोड येतात. जर तुम्हाला असे लक्षण दिसले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार सुरू करावे.

थकवा किंवा अशक्तपणा

हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन कमकुवत होते. यामुळे शरीराच्या अवयवांमध्ये ब्लड सर्कुलेशन योग्यरित्या होत नाही. यामुळे रुग्णांना कोणत्याही कारणाशिवाय अत्यंत अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. त्याच वेळी शरीरात उर्जेची कमतरता असते. तुम्हाला सारखा थकवा जाणवते असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

त्वचेवर सुज येणे

जेव्हा शरीरात कोलेस्टॉलची पातळी वाढते तेव्हा रक्त प्रवाह योग्यरित्या होत नाही. यामुळे शरीरातील अवयवांवर सूज येते. त्याच वेळी, शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवते. ही लक्षणे तुम्हालाही असेल तर घरीच उपचार न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत रेल्वे आता स्लीपर कोचमध्ये, 'या' मार्गावर धावणार; पैसा आणि वेळेचीही होईल बचत

Nagpur Munciple Election 2025 : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून अपक्ष उमेदवाराला घरातच कोंडलं

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक

Navi Mumbai Crime : ऑनलाईन मैत्री ठरली जीवघेणी, दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण अन् मागितली २० लाखांची खंडणी

Bribery Action: बुलढाण्यात सहायक वनसंरक्षक व लिपिकाला १५ हजारांची लाच घेताना पकडलं, लाचलुचपतच्या कारवाईने खळबळ!

SCROLL FOR NEXT