लाइफस्टाइल

Heart Attack Risk: लहान वयातही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, यामागे नेमकं कारण काय?

कमी वयात हार्ट अटॅक का येतोय? जाणून घ्या

Aishwarya Musale

सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे  लक्ष देणं फार गरजेचं झालं आहे. आरोग्याकडे थोडा जरी निष्काळजीपणा केला तर तो महागात पडू शकतो.  वाढत्या वयानुसार हृदयविकाराचा धोका वाढतो.

हा आजार लहानपणापासूनच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून टाळता येऊ शकतो, जो जगभरातील स्त्री आणि पुरुष दोघांच्या मृत्यूच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

पूर्वीच्या काळी मिडिल एज आणि वृद्ध लोक कोरोनरी आजाराला बळी पडत असत, परंतु बदलत्या काळानुसार या आजाराचा धोका तरुणांमध्येही दिसून येत आहे, जो टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, असंसर्गजन्य रोगांशी संबंधित 45 टक्के मृत्यूंना कोरोनरी आर्टरी डिजीज, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब जबाबदार आहे. तर 22 टक्के लोकांचा मृत्यू श्वसनाच्या आजाराने, 12 टक्के लोकांचा कर्करोगामुळे आणि 3 टक्के लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो.

कमी वयात हृदयविकार टाळा

लहान वयात येणारे 80 टक्के हृदयविकाराचे झटके टाळता येतात, जर लवकर यावर उपाय केला तर. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान टाळणे, सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, वजन योग्य ठेवणे, रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण लहान वयातच सुरू करावे.

हृदयविकाराची लक्षणे

डॉक्टरांच्या मते, विशिष्ट हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये व्यायामादरम्यान छातीत दुखणे किंवा एनजाइना यांचा समावेश होतो. श्वास घेण्यात अडचण, घाम येणे, अस्वस्थता, एपिगॅस्ट्रिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT